मनीष तसरे /अमरावती
अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने रविवारी पहाटे हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत 2300 पेक्षा अधिक धावकांनी सहभाग घेतला होता. लहान चिमुकल्यांचा किलबिल, तरुणांचा उत्साहपूर्ण जोष व वरिष्टांच्या सहभाग यामुळे अतिशय उत्कंठा पूर्वक वातावरणात ही हाफ मॅरेथॉन संपन्न झाली. २१ कि.मी. अंतराची हाफ मॅरेथॉन सकाळी वेळेवर ६.०० वाजताच सुरु झाली.
पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त मनपा आयुक्त आदी मान्यवरांनी या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून केली. २१ कि.मी. ही हाफ मॅरेथॉन जवाहरलाल नेहरु स्टेडीयम येथून सुरु झाली. या स्पर्धेचा मार्ग जिल्हा स्टेडियम पंचवटी चौक वेलकम पाईंट बियाणी चौक नेताजी कॉलनी - मार्डी - रोड परत विद्यापीठ परिसर परत बियाणी चौक वेलकम पॉईंट बियाणी चौक इर्वीन - चौक- राजकमल उडान पुल राजापेठ पोलीस स्टेशन पासून परत राजकमल उड्डान पुल. इर्वीन चौक • जिल्हा स्टेडीयम असा होता. १० कि.मी. पावर रन सकाळी ६.१५ वाजता लहान मुलांचा ५ कि.मी. व ५ किमी फीटनेस चॅलेंज ही स्पर्धा ६.३० वाजता सुरु झाली. या स्पर्धेत सहभाग होता यामध्ये अमरावती, नागपुर, यवतमाळ, अकोला मुंबई येथील अधिकारी न कर्मचारी सहभागी झालेत.
स्पर्धेअंती सर्व गटातील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज व रोख बक्षीस देण्याकरीता बक्षीस वितरण समारंभ सकाळी ९.३० वाजता आयोजीत करण्यात आला होता. एकूण ३.२५ लक्ष रुपयाचे रोख बक्षीस सर्व विजेत्यांना देण्यात आले.