अमरावती : कोल्हटकर कॉलनी येथील एका खोलीतून लॅपटॉप, मोबाईल व इलेक्ट्रिक वायरचे बॉक्स असा ७३ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. त्या चोरीचा उलगडा करण्यात राजापेठ पोलिसांना यश आले असून, त्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. एका विधिसंघर्षित बालकाला सुधारगृहात पाठविण्यात आले. अटक आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
दर्शन जाजू हे त्यांच्या रुममध्ये दरवाजा लोटून झोपले असता अज्ञाताने त्यांच्या खोलीतून ७३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दर्शन जाजू (२५, कोल्हटकर कॉलनी) यांनी याप्रकरणी २४ ऑक्टोबर रोजी राजापेठ पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली होती. गुन्ह्याचा तपासादरम्यान शिवतेज दिलीप देशमुख, जय हरीदास विठोले व एका विधिसंघर्षित बालकाने ती चोरी केल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह, डीसीपी विक्रम साळी, एसीपी भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक विजय वाकसे, अंमलदार रवि लिखितकर, शेख दानिश, राहुल फेरन यांनी केली.