फटका : आता चौथ्या यादीची प्रतीक्षाअमरावती : स्मार्टसिटीच्या तिसऱ्या यादीतही अमरावतीला स्थान पटकावता आलेले नाही. तिसऱ्या यादीमधून अमरावती बाद झाले असून अमरावती वगळता राज्यातील अन्य चार शहर स्मार्टसिटीच्या यादीत झळकले आहे.केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी देशभरात विकसित करण्यात येणाऱ्या स्मार्टसिटीच्या तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ठ असलेल्या शहरांची नावे घोषित केली. या यादीमध्ये राज्यातील नागपूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक या पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. स्मार्टसिटी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण ६३ शहरांनी सहभाग घेतला होता. यामधील २७ शहरांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे अमरावती महापालिकेने ३० जूनला स्मार्टसिटीसाठी दुसऱ्या फेरीसाठी २२६२ कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र या सर्वसमावेशक प्रस्तावाचा स्पर्धेत टिकाव लागू शकला नाही. पहिल्या फेरीसाठी महापालिकेने ग्रीनफिल्ड या घटकांतर्गत तब्बल ५५०० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे दाखल केला होता. मात्र पहिल्यांदाही अमरावतीच्या पदरी निराशाच आली. दुसऱ्यांदा त्रुटीरहित प्रस्ताव पाठविण्याचा दावा यंत्रणेकडून करण्यात आला. मात्र दुसऱ्यांदाही नंबर हुकल्याने अमरावतीकरांच्या पदरी निराशाच पडली आहे. (प्रतिनिधी)स्मार्टसिटीच्या तिसऱ्या यादीत अमरावती शहराचा समावेश झालेला नाही. आता प्रतीक्षा करावी लागेल. आम्ही त्रुटीरहित प्रस्ताव सादर केला होता. - हेमंत पवार,आयुक्त, महापालिका
स्मार्ट सिटीतून अमरावती बाद
By admin | Published: September 21, 2016 12:13 AM