मागणी वाढली : आठ तासांपर्यंत वीज खंडीत लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागणीत झालेली वाढ आणि वीजगळतीचे प्रमाण वाढल्याने शहरात पुन्हा वीज भारनियमन सुरू झाले आहे. काही भागांत दोन, तर काही भागांत तब्बल आठ तास वीजपुरवठा खंडित राहणार आहे. नागरिकांनी विजेचा जपून वापर करावा, देयकांचा वेळेवर भरणा करावा तथा वीजचोरी थांबवावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एकीकडे जीवाची लाही लाही होत असताना दुसरीकडे भारनियमनाचे संकट उभे ठाकले आहे. राज्याला सुमारे १५ हजार मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. मात्र, कोयना धरणातील जलपातळीत घट झाल्याने तो वीज प्रकल्प बंद करण्यात आला. त्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. सुमारे १ हजार मेगावॅट विजेची तूट निर्माण झाल्याचा अंदाज असून ती तूट भरून काढण्यासाठी भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्याची झळ अमरावतीकरांनाही सोसावी लागणार आहे. शहराला ५० मिलियन युनिट (एब्युज) इतकी वीज दररोज लागते. मात्र, उन्हाळ्यात वीज उपकरणांचा वापर वाढत असल्याने विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने वीज वितरण कंपनीकडून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. ज्या परिसरात विजेची तूट सर्वाधिक आहे व वीज देयकांची वसुली कमी प्रमाणात होते,अशा परिसरात आठ तास भारनियमन कले जाणार आहे. ज्या परिसरात विजेची तूट कमी आहे.
पुरवठ्यावर लक्ष अमरावती : विजेच्या बिलांची वसुली अधिक आहे, अशा परिसरात दोन ते चार तासाचे भारनियमन केले जाईल. दोन दिवसांपासून सुरु झालेल्या भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. आणखी दोन महिने हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे संकेत महावितरणच्या शहर विभागाने दिले आहे. राज्यभरात विजेची मागणी वाढली असून वीज पुरवठ्याबाबत प्रत्येक सेकंदाच्या आकडेवारीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. अमरावती शहरातील विजेची मागणी व पुरवठ्याबाबतच्या सर्व नोंदीची अपडेट माहिती वरिष्ठ स्तरावर घेतली जात आहे व त्या अन्वये भारनियमन केले जात आहे.विजेची मागणी वाढली व पुरवठा कमी झाल्याने भारनियमन सुरु झाले आहे. विजेची तुट अधिक व बिल वसुली कमी असलेल्या परिसरात भारनियमन तास अधिक आहे. विजेची तूट कमी व बिल वसुली अधिक असलेल्या परिसरात भारनियमन कमी आहे. नागरिकांनी विजेचा वापर जपून करा तसेच वेळेवर देयक भरून गैरसोय टाळावी. - सौरभ माळी, कार्यकारी अभियंता, महावितरणकाय आहे ए १ ते जी २ ? महावितरणच्या ज्या फिडरवर विजेची तूट सर्वात कमी आहे, तसेच वीज वसुलीचे प्रमाण अधिक आहे, अशा फिडरला ए-१ समूहात गणले जाते. तर विजेची सर्वाधिक तूट व वसुली सर्वात कमी असणारा परिसर हा जी १ समूहात मोडतो. ए-१ समूहातील परिसरात सर्वात कमी अर्थात ३ तास १५ मिनिटे भारनियमन राहणार आहे. जी-१ समूहातील परिसरात सर्वाधिक म्हणजेच तब्बल आठ तास भारनियमन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ए-१, ए-२, बी-१, बी-२, सी-१, सी- २, डी-१, डी-२, एफ-१, एफ-२ अशाप्रकारे समुह तयार करून त्या-त्या परिसरात भारनियमन करण्यात येत आहे. ए-१ ते जी-२ पर्यंतच्या सर्व समूहात शहरातील विविध परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भारनियमनाचे तासए १ - सकाळी ७.३० ते ९ व दुपारी २.३० ते ४.१४ ए २ - सकाळी ९ ते १०.४५ व दुपारी ४.१५ ते ५.४५बी १ -सकाळी ७.३० ते ९.३० दुपारी २ ते ४बी २ - सकाळी ९.३० ते ११.३० व दुपारी ४ ते ६ सी १ - सकाळी ६ ते ८.३० व दुपारी १.४५ ते ४ सी २ - सकाळी ८.३० ते २.१५ दुपारी ४ ते ६.३० डी १ - सकाळी ६ ते ८.४५ व दुपारी १२.३० ते ३.१५ डी २ - सकाळी ८.४५ ते ११.३० व दुपारी ३.१५ ते सायंकाळी ६.३० एफ १ -सकाळी ६ ते ९.३० व दुपारी ११.३० ते ३ एफ २ - सकाळी ९.३० ते १ व ३.३० ते सायंकाळी ७ फिडरनुसार भारनियमनाचे परिसर३.१५ तास- न्यु कॉटन मार्केट, विद्युतनगर, सौरभ कॉलनी, रंगोली, एसआरपीएफ, सर्किट हाऊस, कॅम्प, श्यामनगर, रेल्वे स्थानक, श्रीकृष्ण पेठ, टाऊन १ व २, मनसिंगका, टाऊन ३, बडनेरा, माहुली, लक्ष्मी, ईस्कान, कांतानगर, सीपी आॅफीस, न्यू शंकरनगर, बुधवारा, अंबादेवी, महाजनपुरा, राजकमल, जवाहर गेट, मालविय चौक, कॉटन मार्केट, एमआयडीसी, एकवीरा, दस्तुरनगर. ४ तास - प्रशांतनगर, रुख्मिणीनगर, एलआयसी, चपराशीपुरा, साईनगर, रवीनगर, म्हाडा, कालीमाता मंदीर४.४५ तास - अंध विद्यालय, चौधरी चौक, वडाळी, गिट्टीखदान, काँॅग्रेसनगर, दत्तविहार, एमआयडीसी. ५.३० तास - ११ केव्ही नवोदय, महर्षी, मोरबाग, लोणटेक. ८ तास - पाटीपुरा, भाजीबाजार, ताजनगर, इमाननगर, हाथीपुरा, रोशननगर, नवसारी, चित्रा चौक, गडगडेश्वर, न्यु ताजनगर.