शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

अमरावतीनेच घडविले, परतफेड करण्याची वेळ आता माझी!

By admin | Published: November 07, 2015 12:05 AM

अमरावतीच्या भूमीत मी घडलो. पालकमंत्रिपदापर्यंतची झेपही याच भूमीची देण. आता वेळ माझी आहे.

पालकमंत्री प्रवीण पोटे : भूषणावह शहरनिर्मितीचा संकल्प, गतिमान प्रशासनाचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वीलोकमत मुलाखतअमरावती : अमरावतीच्या भूमीत मी घडलो. पालकमंत्रिपदापर्यंतची झेपही याच भूमीची देण. आता वेळ माझी आहे. विकासाच्या रुपाने शक्य ते सर्व अमरावतीला परत करायचे आहे. प्रत्येकाला भूषण वाटेल, असे शहर साकारण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली आहेत... अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या बोलण्यातून मायभूच्या विकासाची तळमळ झिरपत होती. निमित्त होते 'लोकमत'शी बातचितीचे. पालकमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून अमरावती जिल्ह््यातील प्रशासनात कमालिचा बदल घडवून आणणारे ना.पोटे पाटील गतीमान व्यवस्थेवर भर देतात. सामान्य माणसांकडून आलेल्या अर्ज, तक्रारींवर निश्चित कालावधीत निर्णय व्हायलाच हवा, हा त्यांनी आखून दिलेला नियम आता येथील जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अंग झाला आहे. या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने प्रशासन दखलनीयरित्या गतीमान झाले आहे. या आदेशांनंतरही सामान्य दुर्लक्षित रहात असतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाशेजारीच असलेल्या ना. पोटे यांच्या कार्यालयातून प्रशासनाला जाब विचरणारी यंत्रणाही कार्यरत आहे. दिवा, लवाजमा, सुरक्षा ताफा यात रमण्याऐवजी जिल्हा विकासाच्या कल्पनेत रमणारे पालकमंत्री वेळ मिळेल तेव्हा, एकटेच ड्राईव्ह करीत शहराची भ्रमंती करतात. बरेचदा ते अधिकाऱ्यांना शहर दाखवितात. प्रसिद्धी माध्यमांना टाळून अवलंबल्या जाणाऱ्या या कार्यप्रणालीमागील उद्देश सांगताना ना.पोटे म्हणतात, कधिकाळी लहानगे शहर असलेली आपली अमरावती आता महानगर झाले. शहराचा स्वभाव, शहराच्या गरजा एक नागरिक म्हणून मला ठाऊक आहेत. शहराची शक्तीस्थळे आणि शहराच्या मर्यादांशी मी परीचित आहे. प्रशासनाचा क्षमतापूर्ण वापर करून घ्यावयाचा असेल तर विविध प्रशासकीय प्रमुखांना शहरातील उणे अधिक कळायला हवे. काय नेमके केले की विकास होईल, काय रोखले की लोकोपयोगिता वाढेल या बाबी एकदा का प्रशासनाला कळल्यात की निश्चित दिशा मिळते. या दिशानिश्चितीसाठीच मला हा प्रयोग महत्त्वपूर्ण वाटतोे. अमरावती शहराचा समावेश 'स्मार्ट सिटीं'च्या यादीत होणार की नाही याबाबत अमरावतीकरांना धाकधूक असतानाच ना.पोटे यांच्या ठोस प्रयत्नांनी शहराचा स्मार्ट यादीत समावेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन याकामी महत्त्वूपर्ण ठरल्याचे ना.पोटे आवर्जून सांगतात. या दोन नेतृत्त्वांमुळेच शहर विकासाच्या कल्पना प्रत्यक्षात साकारतील असा विश्वास ना. पोटे यांना आहे. स्मार्ट सिटी निर्मितीच्या अनुशंगाने दिल्लीहून आलेल्या विशेष अधिकाऱ्यांच्या चमुसोबत ना.पोटे यांनी स्वत: शहरभर दौरा करून रस्ते, मल्टिप्लेक्स पार्किंग कुठे व्हावेत याबाबत मार्गदर्शन केले. विकासकार्यातील त्यांचा हा सक्रीय सहभाग दखलनीय ठरला आहे. शहराचा कायापालट करण्यासाठीची पायाभूत व्यवस्था तयार करण्याच्या दिशेने शासन-प्रशासन स्तरावर अधिकृत सुरुवात झाली आहे. तिनेक वर्षांत त्याचे प्रत्यंतर येईलच, असा विश्वास ना.पोटे यांनी व्यक्त केला. 'स्मार्ट सिटी' निर्मितीसाठी आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमांना फळ आले. आता प्रत्यक्ष शहर साकारण्याचा टप्पा पुढ्यात आला आहे. त्यासाठी जसा सर्वपक्षीय तसाच तमाम जनतेचा सक्रीय सहभागही व्हावा, अशीच एकंदर व्यवस्था उभारण्याकडे ना.पोटे यांनी कटाक्ष ठेवला आहे. रस्ते, पूल, उडाणपूल, पार्किंग मल्टिप्लेक्स, उद्योग, वीज, पाणी यासंबंधिच्या सर्वांगिण मुद्यांवर लक्ष केंद्रीत केलेले असतानाच नव्या पिढीच्या बुद्धीमत्तेला पोषक वातावरण उपलब्ध व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे ना. पोटे म्हणाले. जगाला गवसणी घालावी अशी तल्लख बुद्धीमत्ता अमरावती, विदर्भातील मुलांमध्ये असल्याचा विश्वास ना.पोटे नेहमीच व्यक्त करतात.