शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
6
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
7
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
8
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
9
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
10
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
12
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
13
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
14
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
15
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
16
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
17
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
18
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
19
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
20
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

अमरावतीची डिजिटल सिटीकडे वाटचाल !

By admin | Published: November 12, 2016 12:11 AM

सिडकोकडून मिळणाऱ्या १०० कोटींमधून अमरावती शहराचे रुपडे पालटणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेत अमरावतीचा डिजिटल अमरावती म्हणून विकास केला जाणार आहे.

एसपीव्हीची दुसरी बैठक : ५० कोटींचे नियोजनअमरावती : सिडकोकडून मिळणाऱ्या १०० कोटींमधून अमरावती शहराचे रुपडे पालटणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेत अमरावतीचा डिजिटल अमरावती म्हणून विकास केला जाणार आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी ‘अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ या एसपीव्हीची दुसरी बैठक महापालिका सभागृहात घेण्यात आली.एसपीव्ही या शासकीय कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या याबैठकीत सिडकोकडून पहिल्या हप्त्यापोटी प्राप्त ५० कोटींमधून होणाऱ्या कामांवर चर्चा करण्यात आली. महापौरांच्या अध्यक्षतेतील प्रकल्प समितीने सुमारे ६५ कोटी रुपयांची कामे सुचविली होती. त्यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली.राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अमरावती महापालिकेला सिडकोकडून १०० कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीचा पहिला हप्ता म्हणून ५० कोटी रिलिज करण्यासाठी एसपीव्हीचे गठन करणे बंधनकारक होते. त्या अनुषंगाने ‘अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ या एसपीव्हीचे गठन करण्यात आले. पॅनसिटीअंतर्गत विकासअमरावती : एसपीव्ही अर्थात ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ ही एक शासकीय कं पनी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची दुसरी बैठक शुक्रवारी घेण्यात आली. यामध्ये प्रकल्प समितीने सूचविलेल्या कामांबाबत चर्चा झाली. पॅनसिटी संकल्पनेनुसार शहराचा विकास केला जाणार आहे. डिजिटल टेक्निक वापरून विकास साध्य केला जाईल. पॅनसिटीमध्ये संगणकीकृत कमांड व कंट्रोल सेंटर, गुन्हेगारी नियंत्रणासाठी सीसीटीव्ही, तक्रार निवारण तसेच सार्वजनिक उपयुक्तता अ‍ॅप, आॅप्टीकल फायबर नेटवर्क, डाटासेंटर, सोलर पॅनेल, प्रभागनिहाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, ३ ठिकाणी स्मार्ट पार्किंग, आॅनलाईन हवा व ध्वनीप्रदूषण नियंत्रण प्रणाली, महापालिकेसाठी केंद्रीय माहिती व्यवस्थापन, जीआयएसवर आधारित महसूल वसुली, कर्मचारीक्षमता बांधणी ,डिजिटल साईन बोर्डचा या प्रकल्पांत समावेश आहे. ‘अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ या एसपीव्हीच्या शुक्रवारच्या दुसऱ्या बैठकीला संचालक मंडळाचे अध्यक्ष तथा नियोजन विभागाचे अप्पर सचिव सुनील पोरवाल, महापौर चरणजितकौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते,आयुक्त हेमंत पवार, स्थायी सभापती अविनाश मार्डीकर, प्रभारी पोलीस आयुक्त विवेक पानसरे, पक्षनेते बबलू शेखावत, विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर, नगरसेवक तुषार भारतीय, एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश देशमुख आदी उपस्थित होते.या विषयांवर झाली चर्चा संचालक मंडळाच्या बैठकीस अनुपस्थित राहण्याबाबत परवानगी द्यावी, सिडकोकडून पा्रप्त होणाऱ्या ५० कोटींमधून प्रकल्प समितीने सूचविलेली कामे करण्याबाबत, एसपीव्हीकरीता मानव संसाधन तज्ज्ञांची नियुक्ती करणे आणि अमरावती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या एसपीव्हीचा लोगो कसा असावा, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.महापौर प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी महापौर चरणजित कौर नंदा यांची एसपीव्ही अंतर्गत सब कमिटी असलेल्या प्रोजेक्ट कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.एसपीव्हीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. स्मार्ट सिटीसाठी पहिल्या हप्त्यात मिळणाऱ्या ५० कोटींमधून शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.प्रोजेक्ट कमिटीत महापौर,जिल्हाधिकारी गित्ते आयुक्त हेमंत पवार आणि एसपीव्हीचे सीईओ महेश देशमुख यांचा समावेश आहे.