- उज्वल भालेकर अमरावती - स्वामी तिन्ही जगाचा आईविना भाकारी, ही म्हण सत्यात उतरविणाऱ्या अनेक उदाहारणे आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे आतापर्यंत पार पडलेल्या ४१ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये २६ मातांनी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी किडनी दान केली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या किडनी प्रत्यारोपणासाठीही आपल्या २६ वर्षीय मुलासाठी ४४ वर्षीय आईने किडनी दान केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील रहिवासी असलेला सचिन विनोद ओझा (२६) हा मागील ५ महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. त्यामुळे त्याच्यावर डायलेसिस उपचार सुरू होते. परंतु दर महिन्याला करावे लागणारे डायलेसिस यामध्ये होणारा त्रास लक्षात घेता आई अनुपम विनोद ओझा (४४) यांनी आपल्या मुलाला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथे ४१ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. रुग्णालयातील ही २६ वी माता होती जिने आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी किडनी देण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी रुग्णालय प्रशासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत केली. सुपरचे एमएस डॉ. अमोल नरोटे, ओएसडी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. प्रणित काकडे, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अब्बास अली, आरएमओ डॉ. माधव ढोपरे, किडनी ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी, यांनी यशस्वी केली. यावेळी परिचारिका अनिता तायडे, सरला राऊत, कविता बेरड, नीलिमा तायडे, लता मोहता, अभिषेक नीचत, स्नेहल काळे, कीर्ती तायडे, तेजल बोंडगे, अल्याझा तेलगोटे, नम्रता दामले, अनिता खोब्रागडे, योगिश्री पडोळे, रेखा विश्वकर्मा तसेच अभिजित देवधर, वैभव भुरे, अनु वडे, नितीन मते यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर आई आणि मुलगा दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.