लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी अमरावती शहरातून १०६ पोलीस अधिकारी-कर्मचारी रवाना झाले. नागपूर येथे १६ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन असून, नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मंत्रीमंडळासह राज्यभरातील आमदार आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांची या काळात नागपुरात वर्दळ राहणार आहे. अशा स्थितीत आंदोलने होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी राज्यभरातून पोलीस यंत्रणा नागपुरात दाखल झाली आहे. यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामधून १०६ अधिकारी-कर्मचारी शुक्रवारी नागपूरला रवाना झाले.यामध्ये १ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४ पोलीस निरीक्षक, १६ पोलीस उपनिरीक्षक, ८५ कर्मचारी यांचा समावेश आहे. सदर पोलिसांचा बंदोबस्त हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत राहणार असल्याची माहिती शहर आयुक्तालयाने दिली.
हिवाळी अधिवेशनासाठी अमरावती पोलीस नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:00 AM
राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन असून, नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मंत्रीमंडळासह राज्यभरातील आमदार आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांची या काळात नागपुरात वर्दळ राहणार आहे. अशा स्थितीत आंदोलने होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
ठळक मुद्देबंदोबस्ताची पार्श्वभूमी : १०६ पोलीस अधिकारी-कर्मचारी रवाना