शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

अमरावती-पुणे वातानूकुलित स्पेशल 'ट्रेन' मंजूर

By admin | Published: October 03, 2016 12:15 AM

अमरावती - पुणे वातानुकुलित स्पेशल ट्रेन मंजूर करण्यात आली आहे.

रेल्वेमंत्री येण्याचे संकेत : ६ आॅक्टोबर रोजी होणार शुभारंभअमरावती : अमरावती - पुणे वातानुकुलित स्पेशल ट्रेन मंजूर करण्यात आली आहे. या रेल्वे गाडीचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ६ आॅक्टोबर रोजी होण्याचे संकेत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून खा. आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.अमरावतीत रविवारपासून सुरू झालेल्या जाणता राजा या महानाट्यात येण्याबाबतचे पत्र रेल्वेमंत्री प्रभू यांना देण्यात आले आहे. ना. प्रभू यांनी ६ आॅक्टोबर रोजी येण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार अमरावती- पुणे मंजूर झालेल्या रेल्वे गाडीचा शुभारंभ ना. प्रभू यांच्या हस्ते करण्याची तयारी देखील रेल्वे प्रशासनाने चालविली आहे. तसेच बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन रिपेअरींग वर्कशॉप प्रोजेक्ट भूमिपूजन करण्याचे प्रस्तावित आहे. खा. आनंदराव अडसुळ यांनी अमरावती येथील नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्याची फलश्रूती म्हणून रेल्वेमंत्री यांचेकडून दखल घेण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार अमरावती-पुणे वातानुकुलीत नवीन गाडी मंजूर करण्यात आली आहे.नागपूर-अमृतसर ही वातानुकुलीत गाडी नागपूरवरून अमृतसर जाणार आहे. ही गाडी दर मंगळवारी नागपूर येथून बडनेरा-मनमाड-दौंड मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या गाडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी पुणे येथून दर बुधवारी आणि गुरूवारी अमरावती मॉडल स्टेशन येथून सोडण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. या रेल्वे गाडीमुळे आठवड्यातून दोन दिवस अमरावतीकरांना पुणे येथे जाण्या व येण्याची सोय उपलब्ध होणार आहे. सदर गाडी ही अमरावती मॉडेल स्टेशन येथून १२.४५ वाजता सुटणार असून ही गाडी १३.५ बडनेरा, १४.१० अकोला, १६.१५ भुसावळ, १९.६ मनमाड, २०.२७ कोपरगाव, २२.५७ अहमदनगर, ०१.५ दौंड, पुणे या ठिकाणी पोहचणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान ६ आॅक्टोंबर रोजी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करावा, अशी विनंती ना. प्रभू यांना करण्यात आली आहे. सन २०१०-११ मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी २७४.५७ कोटी पिंक बूक आयटम क्रमांक ३३४ नुसार बडनेरा वॅगन रिपेरींग फॅक्टरीकरीता मंजूर केले होते. फॅक्टरीसाठी १८९ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. ३१६.१० कोटी रुपयाला रेल्वे मंत्रालयातर्फे मंजुरी प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी)