शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Amravati: रेड्यांची टक्कर घेतली, वनाधिकाऱ्यांची धाड पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 12:02 AM

Amravati News: राखीव वनक्षेत्रात रेड्यांची झुंज लावताच वनाधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि मालवाहू वाहनासह पाच वाहने ताब्यात घेतली. याशिवाय आयोजकांसह उपस्थितांवर वनक्षेत्रात शिरकावप्रकरणी वनगुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

- मनीष तसरेअमरावती - राखीव वनक्षेत्रात रेड्यांची झुंज लावताच वनाधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि मालवाहू वाहनासह पाच वाहने ताब्यात घेतली. याशिवाय आयोजकांसह उपस्थितांवर वनक्षेत्रात शिरकावप्रकरणी वनगुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वनविभागाने त्वरेने केलेल्या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला, तर झुंजीसाठी पायपीट करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

महाराष्ट्रात रेड्यांच्या टकरी लावण्यास बंदी असली तरी अनेक ठिकाणी त्या लावण्यात येतात. बुधवारी वडाळी येथील फुटका तलाव परिसरात ही टक्कर लावण्यात आली. त्याची माहिती मिळताच अनेक हौशींनी गर्दी केली. काहींनी पायीच, तर काहींनी दुचाकीने हे ठिकाण गाठले. मात्र, अनेक लोक जंगलात शिरल्याचे आणि अनधिकृत असलेली रेड्यांची टक्कर होत असल्याचे कळताच वडाळी रेंजच्या वनअधिकारी वर्षा हरणे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि सहकाऱ्यांसमवेत तेथे असलेली वाहने जप्त केली. यात एक मालवाहू वाहन, तर पाच दुचाकी त्यांनी घटनास्थळावरून जप्त केल्या.

राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी शिरकावास मनाई असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांनी हा प्रकार केला तसेच अनधिकृत झुंज लावल्याप्रकरणी आयोजकांसह उपस्थितांवर वनगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू होती. या घटनेची माहिती त्यांनी फ्रेजरपुरा पोलिसांनासुद्धा दिली.

टॅग्स :Amravatiअमरावती