शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

Amravati: ४५ वर्षांपासून आरएफओंचा वेतनासाठी संघर्ष; आता शासन निर्णयाकडे लक्ष

By गणेश वासनिक | Published: June 01, 2024 6:32 PM

Amravati News: राज्याच्या वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पदानुसार वेतन मिळत नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. वेतन त्रुटी समितीपुढे समकक्ष पदानुरूप पगार मिळावा, याकरिता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने वनबल प्रमुखांनी शासनाकडे अहवाल सादर केलेला आहे.

- गणेश वासनिक  अमरावती - राज्याच्या वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पदानुसार वेतन मिळत नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. वेतन त्रुटी समितीपुढे समकक्ष पदानुरूप पगार मिळावा, याकरिता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने वनबल प्रमुखांनी शासनाकडे अहवाल सादर केलेला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची ९९२ पदे असून, राज्याच्या वन विभागाचा डोलारा या पदावर अवलंबून आहे. अत्यंत जिकरीचे आणि वर्ग दोनचे हे पद असताना गेल्या ४५ वर्षांपासून पदानुरूप वेतन नसल्याची ओरड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांमध्ये दिसून येते. वेतन वाढीकरिता २५ वर्षांपूर्वी आणि २०१८ मध्ये काम बंद करण्यात आले होते. शासनाने आश्वासन दिल्यानंतर सुद्धा पदाला साजेसे वेतन मिळत नसल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरलेला आहे. सातव्या वेतन आयोगाने या पदाला वेतन निश्चिती करताना दुय्यम स्थान दिले आहे. अशी कैफियत राज्यातील ९९२ आरएफओंनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) शैलेंद्र टेंभुर्णीकर यांच्याकडे मांडलेली आहे. वेतन सुधारणा करण्यासाठी निवारण समितीला ३१ मेपर्यंत निर्णय द्यायचा आहे. वेतन श्रेणीत कमतरतावनपरिक्षेत्र अधिकारी हे पद वर्ग २ चे असून, या पदाला राजपत्रित म्हणून घोषित केलेले आहे. आहरण व संवितरण, कार्यालय प्रमुख, वृक्ष अधिकारी, वन्यजीव रक्षक, वन विभागातील तालुकाप्रमुख, चौकशी अधिकारी, अभियांत्रिकी कामे, वैज्ञानिक कर्तव्य, वन कायद्याची अशी अनेक जबाबदारी दिली आहे. असे असताना नायब तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक या पदाप्रमाणे वेतनश्रेणी दिली जात आहे. या पदाचे सध्या स्थितीत एस-१५ नुसार ४१८००-१३२३०० असे वेतन मिळत आहे. यात दुरुस्ती करण्याबाबत सातव्या वेतन आयोगाच्या निवारण समितीपुढे शिफारस केलेली आहे. वनबल प्रमुखाची शिफारसराज्याचे वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर हे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या वेतनाबाबत गंभीर असून, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी निवारण समितीला शिफारस करण्याकरिता प्रधान सचिव वने यांना २१ मे २०२४ रोजी पत्र दिले आहे. तसेच पदानुरूप वेतन नसल्याचे पत्रात नमूद केलेले आहे. मात्र वन विभागाचे प्रधान सचिव याकडे किती लक्ष देऊन पाठपुरावा करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरते.

टॅग्स :Amravatiअमरावती