शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

Amravati: गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही उलटली, दोन ठार, २८ जखमी 

By प्रदीप भाकरे | Published: August 25, 2024 3:46 PM

Amravati News: गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात नागपूरहून अकोल्याकडे जाणाऱ्या शिवशाही बस रस्त्याखाली जाऊन उलटली. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील पेट्रोलपंपासमोर हा अपघात घडला. या अपघातात दोन जण ठार झाले. तर २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

- प्रदीप भाकरेअमरावती - गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात नागपूरहून अकोल्याकडे जाणाऱ्या शिवशाही बस रस्त्याखाली जाऊन उलटली. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील पेट्रोलपंपासमोर हा अपघात घडला. या अपघातात दोन जण ठार झाले. तर २८ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेनंतर महामार्गावर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदगाव पेठ पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले.

एम.एच.०९ इ.एम १७७८ ही नागपूर अकोला शिवशाही बस नागपूरहून अमरावती येत असतांना सावर्डीनजीकच्या पेट्रोल पंपासमोरील दुभाजकावरून अचानक गायीने उडी मारली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनांवरून नियंत्रण सुटले आणि शिवशाही बस उलटली. यामध्ये एकुण ३५ प्रवासी होते. त्यापैकी दोन जण जागीच ठार झाले. पंचफुला रामकृष्ण इंगळे (७५, रा.राजुरा, चांदूरबाजार) व आदित्य लीलाधर इंगळे (२३, रा.नागपूर) अशी मृतांची संख्या आहे. तर जखमींमध्ये रामराव आप्पा सावंत (६५, रा.तिवसा), मीरा माणिकराव कडूकर (रा.अचलपूर), माणिक मारोतराव कडुकार (६५, बेगमपुरा अचलपूर), सिद्धार्थ रामकृष्ण कांबळे (५६, राजुरा, चांदूरबाजार), चंद्रकलाबाई श्रावणाजी चौरे (खोलापूरी गेट, अमरावती), सिंधू भारत लांडगे (४६, रा. तिवसा), विना संतोष बनसोड (४८) व अनिकेत संतोष बनसोड (२२, दोेघेही रा. शिवनगर नागपूर), प्रतिभा कांबळे, माणिक मारोतराव कडूकर (६५, अचलपूर), शैला शैलेंद्र मेश्राम (६०, रा. परतवाडा), कृष्णा दिनेश पटेल (२१, रा.तिवसा), चालक दिनेश प्रल्हादराव विरघट (४५, रा. कौलखेड अकोला), वाहक राधेश्याम प्रकाश साबळे (३१, कानशिवनी अकोला), आशा विनोद खडसे (३८), आशा श्रीधर मेश्राम (६०, नागपूर), प्रतिभा सांगळे आदींचा समावेश आहे. यामध्ये एक तरुणी चक्क बसखाली दबली होती. आयआरबीला पाचारण करून सुद्धा क्रेनची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे माजी जि.प. सदस्य विनोद डांगे यांनी त्यांच्याकडील जेसीबी तातडीने घटनास्थळी आणले. बस वर उचलून त्या युवतीचे प्राण वाचविले. घटनास्थळी तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघात