शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Amravati: पावसाळ्यापूर्वी शिकस्त रस्ते, नाले, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

By जितेंद्र दखने | Published: May 24, 2024 12:23 AM

Amravati News: अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे इमारतींना नुकसान होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारती, शाळा खोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे आदी सुस्थितीत आहेत वा नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी अशा धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाने सुरू केले आहे.

- जितेंद्र दखणेअमरावती -  जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे इमारतींना नुकसान होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारती, शाळा खोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे आदी सुस्थितीत आहेत वा नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी अशा धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाने सुरू केले आहे.

पावसाळ्याचे दिवस आता तोंडावर आले आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. याअनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २९० पूल, ३६७७ रपट्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी  यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मान्सूनपूर्व सुविधा आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच जि. प.च्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय इमारती, शाळा, वर्गखोल्या, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे सुस्थितीत आहेत की नाही, याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना तालुकास्तरावर उपअभियंता बांधकाम आणि बीडीओंना दिल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींचा शोध घेऊन याची यादी संबंधित पोलिस स्टेशन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहितीकरिता पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी शाळा किंवा अंगणवाडी केंद्राच्या इमारती धोकादायक असतील अशी इमारत बंद ठेवून विद्यार्थी, मुलांसाठी सुरक्षित सार्वजनिक इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात शाळा, अंगणवाडी केंद्र सुरू करावेत. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उपअभियंता, बीडीओ आणि संबंधित ग्रामपंचायतीवर सोपविली आहे. सोबतच पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणार नाही. यासाठी अंतर्गत रस्ते, नाले, आणि रपटे यांची आवश्यक दुरुस्ती करण्याऱ्या अनुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिट करून कामे केली जाणार आहेत. मान्सूनपूर्व नियोजनाबाबत सीईओंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी सुरू आहे. तालुका स्तरावरील यंत्रणेकडून धोकादायक इमारतीबाबतचा आढावा घेऊन त्याची माहिती  मागविली आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्तीची कामेही केली जाणार आहेत.  -दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंताबांधकाम विभाग जिल्हा परिषद

टॅग्स :Amravatiअमरावती