- प्रदीप भाकरेअमरावती - एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिच्या टयुशन क्लासमध्ये शिरलेल्या शिक्षकाला दत्तापूर पोलिसांनी लागलीच बेड्या ठोकल्या. राज मोहन रगडे (४०, रा. धामणगाव रेल्वे) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो धामणगावातील एका प्रथितयश शाळेचा शिक्षक आहे.
एका विद्यार्थीनीचा पाठलाग करून राज रगडे हा त्या मुलीच्या ट्युशन क्लासमध्ये शिरला होता. तेथे जाऊन तू माझ्यासोबत का बोलत नाहीस, असे म्हणून त्याने तिला थापडाने मारहाण देखील केली होती. याप्रकरणी, दत्तापूर पोलिसांनी पोलीस स्टेशन दत्तापुर हददीतील से.फ.ला हायस्कुल मधील शिक्षक नामे राज मोहन रगडे वय ४० वर्ष रा. धामणगाव रेल्वे याने एका अल्पवयीन शाळकरी मुलाचा पाठलाग करून तीच्या टयुशन क्लासमध्ये जावुन तीचा वाईट उददेशाने हात पकडुन तु माझे सोबत का बोलत नाही असे म्हणुन तीचे गालावर थापडाने मारहान केली. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरूद्ध २० फेब्रुवारी रोजी विनयभंग, मारहाण, धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
तत्काळ दखल, चटकन अटकउपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तापुरचे ठाणेदार नितीन देशमुख यांनी पिडिताचा रिपोर्ट तात्काळ घेऊन गुन्हा नोंद केला. तथा आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याकरीता पथक तयार केले. त्या पथकाने आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे या करीत आहेत. उपनिरिक्षक विष्णुपंत राठोड, अंमलदार अरूण पवार व सागर कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अल्पवयीन मुली किंवा महिलांना त्रास देण्याचे, त्यांची छेड काढण्याचे प्रकार घडत असल्यास संबधितांनी त्यााबाबत तात्काळ दत्तापूर पोलीस स्टेशन येथे माहिती दयावी.- नितीन देशमुख, ठाणेदार, दत्तापूर