परतवाडा (अमरावती) : आंतरराज्यीय वन सीमा क्षेत्रातील वन्य प्राण्यांची सुरक्षा, अवैध वृक्षतोडीसह होणारी सागवान तस्करी आणि अवैध गतिविधीवर नियंत्रण मिळविण्याकरिता संवेदनशील मार्गांवर अस्थाई नाके उभारण्यावर मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील वन अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत शिक्कामोर्तब केल्या गेले.
मध्य प्रदेशातील कुकरू वन विश्रामगृह परिसरात तील सभागृहात दोन्ही राज्यातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक बुधवारला पार पडली. यात सीमावर्ती जंगल क्षेत्रात गस्त वाढविण्यावरही भर देण्यात आली. सीमा क्षेत्रातील संवेदनशील मार्गांवर प्रस्तावित अस्थाई नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. माहितीचे आदान प्रदान सुलभ व्हावे म्हणून हाय फ्रिक्वेन्सीचे स्वतंत्र वायरलेस सेट वापरल्या जाणार आहेत. दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात कार्यरत वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप तयार केल्या जाणार आहेत. या व्हाट्सअप ग्रुपमध्ये उपवनसंरक्षकांसह सहाय्यक वनसंरक्षकांचा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे.
दोन्ही राज्यातील सीमावर्ती जंगल क्षेत्रात कार्यरत दोन्ही राज्यातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची महिन्यातून दोनदा सीमावर्ती भागात सामूहिक ग्रस्त राहणार आहेत. यात पैदल पेट्रोलिंग सुद्धा केल्या जाणार आहेत. उच्चपदस्थ अधिकारी महिन्यातून एकदा या अस्थाई नाक्यांची तपासणी करणार आहेत. तर मुखबीर तंत्र विकसित करताना नवे मुखबीर तयार करून दोन्ही राज्यातील मुखबीरांकडून प्राप्त माहिती दोन्ही राज्यातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहे.
या संयुक्त बैठकीत मेळघाट प्रादेशिक वन विभागाकडून व बैतुल वन विभागाकडून पीपीटीचे सादरीकरणही केल्या गेले. एकमेकांचे मोबाईल नंबरही एकमेकांना दिल्या गेलेत. तर दोन्ही राज्यातील एसीएफ नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केल्या गेले.
या बैठकीला विजयानन्तम टी.आर. वन मंडलाधिकारी दक्षिण बैतूल, वरून यादव वन मंडलाधिकारी पश्चिम बैतूल, राकेश डामोर वन मंडलाधिकारी उत्तर बैतूल, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोलंकी, सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक सुश्री दिव्याभारती, आकोट वन्यजीव विभागाच्या एसीएफ सुश्री आर्या व्ही एस, सिपना वन्यजीव विभागाचे एसीएफ कमलेश पाटील यांचेसह सीमा क्षेत्रातील जवळपास 100 हून अधिक वन अधिकारी, उप वन मंडलाधिकारी, वन कर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, बीट गार्ड उपस्थित होते