शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

डेंग्यूरुग्णांमध्ये अमरावती अव्वल! पश्चिम व-हाडातील स्थिती भयावह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 5:31 PM

डेंग्यू या जीवघेण्या आजाराचा पश्चिम व-हाडात चोरपावलांनी प्रसार होत आहे. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अमरावती जिल्हा अव्वल असून, खासगी डॉक्टरांकडे एनएस-वन व इतर रक्तनमुन्यांच्या चाचणी पॉझिटिव्ह असलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.

अमरावतीडेंग्यू या जीवघेण्या आजाराचा पश्चिम व-हाडात चोरपावलांनी प्रसार होत आहे. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अमरावती जिल्हा अव्वल असून, खासगी डॉक्टरांकडे एनएस-वन व इतर रक्तनमुन्यांच्या चाचणी पॉझिटिव्ह असलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमधून ३९ पेक्षा जास्त नमुन्यांचा डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल  प्राप्त झाला आहे.डेंग्यू संशयित दोन जणांचा गुरुवारी बळी गेला. इतर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, डेंग्यूवर उपाययोजना करण्यास शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अमरावतीमधील खासगी डॉक्टरांकडे एक हजारापेक्षा जास्त रुग्ण डेंग्यूचा उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांची पहिल्या सात दिवसांत करावयाची एनएस-वन ही रक्त नमुन्यातील चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मागील आठवड्यापर्यंत अमरावती महापालिकेने साडेपाचशेपेक्षा जास्त रक्तनमुने यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमध्ये पाठविले होते. ५० पेक्षा जास्त नमुने हे ग्रामीण भागातूनसुद्धा गेले.  तेव्हा ३९ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरने दिला. परंतु, या ठिकाणी एनएस-वनची किट उपलब्ध नसल्याने अनेक डेंग्यूरुग्ण पॉझिटिव्ह असल्यानंतरही अनेकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्याकारणाने खासगी डॉक्टरांनी केलेल्या चाचण्या व शासकीय अहवालातील चाचणीमध्ये आलेले आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही अनेक रुग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह आहेत. येथून १०० रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. या महिन्यामध्ये  १२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती सेंटिनल सेंटरने दिली आहे. अकोला जिल्ह्यात येथील शासकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार डेंग्यूच्या इलायझा कन्फर्म चाचणीत दोन रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. वाशिम जिल्हयातीही एकही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाने दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातही १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावतीत सर्वाधिक रुग्ण असल्याने शासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे.  डेंग्यूच्या तापाने अनेक जण फणफणत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड दाखविले जात आहेत.

अमरावतीत सर्वाधिक रुग्णशहरातील खासगी डॉक्टरांकडे आतापर्यंत डेंग्यूचे हजारएक रुग्ण आढळून आले. काही डॉक्टरांकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाला अद्यापही माहिती मिळालेली नाही. यासंदर्भात आरोग्य सेवा सहायक संचालक (हिवताप) अभिनव भुते यांनी दोनदा या ठिकाणी बैठकासुद्धा घेतल्या. तरीही डेंग्यूची साथ नियंत्रणात आली नाही. रोज डेंग्यूचे रुग्ण वाढतच असून, सेंटिनल सेंटरने ३९  रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला. परंतु, एनएस-वन चाचणीत शेकडो रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तथापि, शासकीय यंत्रणा अशा रुग्णांना संशयित मानते आणि यवतमाळच्या  अहवालानंतर डेंग्यू असल्याचे निदान करते.

टॅग्स :dengueडेंग्यूAmravatiअमरावती