शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

अमरावतीचा व्यापारी ठरला ‘नायजेरियन फ्रॉड’चा बळी

By admin | Published: May 22, 2017 12:32 AM

सोशल मिडियावरून परिचय झाल्यानंतर पुरेपूर विश्वास संपादन केल्यानंतर शहरातील एका कपडा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सोशल मिडियावरून परिचय झाल्यानंतर पुरेपूर विश्वास संपादन केल्यानंतर शहरातील एका कपडा व्यापाऱ्याला ‘नायजेरियन फ्रॉड’मध्ये अडकविण्यात आले. कॅन्सरवर काम करणाऱ्या औषधी खरेदी व्यवहाराची बतावणी करून आरोपींनी या व्यापाऱ्याची तब्बल ६६ लाख ९९ हजार ४०० रूपयांनी फसवणूक केली. विष्णूनगरातील रहिवासी कैलास शिवप्रसाद तिवारी (५९) यांची फेसबुकवर तीन महिन्यांपूर्वी एका महिलेशी ओळख झाली होती. दोघांमध्ये ‘चॅटिंग’ सुरु झाल्यानंतर महिलेने कैलास यांना युकेमधील एका कंपनीत काम करीत असल्याचे सांगितले होते. आमची कंपनी कॅन्सर व एड्स या रोगाच्या औषधींचे उत्पादन करीत असल्याचे महिलेने कैलास यांना सांगितले. त्यानंतर या महिलेने कैलास यांना ‘ई-मेल’ आयडी देऊन पुढील संवाद सुरूच ठेवला. औषधी निर्मितीसाठी उपरोक्त कंपनी जपान येथून अकीकबरा सीड्सचा कच्चा माल बोलाविते. तो कच्चा माल कंपनीला खरेदी करून दिल्यास कमिशन मिळू शकते, असे या महिलेने तिवारी यांना सांगितले. या औषधीचा कच्चा माल बोलावून आम्हाला दिल्यास ७० टक्के कमिशन देऊ व उर्वरित ३० टक्के आम्ही ठेऊ, असे त्या महिलेने महिलेने तिवारींच्या ‘ई-मेल’वर कळविले. जपान येथील एका मित्राशी संपर्क करून ्रकळवित असल्याचे महिलेने कैलास यांना सांगितले होते. दरम्यान औषधी बनविण्याचा कच्चामाल भारतात सुद्धा उपलब्ध आहे. तो खरेदी करून आम्हाला द्या, असे महिलेने कैलास यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी महिलेने दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात केली. महिलेने दिलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यात कैलास यांनी १ लाख ६३ हजारांच्या रोखीचा भरणा केला. काही दिवसांत एक व्यक्ती कैलास यांच्या घरी आला आणि त्याने औषधी तयार करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या काही बिया सुद्धा कैलास यांना दाखविल्या. महिलेचा पत्ता बनावट अकीकबरा सीडसचा अधिक माल लागणार असल्याची बतावणी केल्याने आरटीजीएसद्वारे कैलास तिवारींनी बँक खात्यात ६६ लाख ९९ हजार ४०० रूपयांचा भरणा केला. मात्र, काही दिवसानंतर तिवारी यांनी महिलेने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता तो पत्ता अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. फसवणूक झाल्याचे कळताच कैलास यांनी शनिवारी राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. आदिश शर्मा, डॉ. कॉसमास व महिलेविरूद्ध कलम ४२०, ४६८ अन्वये गुन्हा नोंदविला.