शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

Amravati: ६० बालकांचा ‘टू-डी इको’, २५ जणांना आढळला हृदयविकार, जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी

By उज्वल भालेकर | Published: July 16, 2024 6:57 PM

Amravati News: अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे मंगळवारी हृदयाचा त्रास होत असलेल्या ६० बालकांचे टू-डी इको करण्यात आले. यामध्ये २५ बालकांमध्ये हृदयाला छिद्र म्हणजेच हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून, लवकरच या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी आरबीएसकेअंतर्गत मोफत हृदयविकार शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

- उज्वल भालेकर अमरावती -  जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे मंगळवारी हृदयाचा त्रास होत असलेल्या ६० बालकांचे टू-डी इको करण्यात आले. यामध्ये २५ बालकांमध्ये हृदयाला छिद्र म्हणजेच हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून, लवकरच या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी आरबीएसकेअंतर्गत मोफत हृदयविकार शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात टू-डी इको तपासणी शिबिर राबविण्यात आले.बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याचे वेळीच योग्य निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. लहान मुलांनाही जन्मत:च हृदयविकार होतात. यामध्ये त्यांच्या हृदयाला छिद्र असणे, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे यांसारखी लक्षणे असतात. त्यामुळे अशा बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे वेळीच निदान करून मोफत उपचार केले जातात. हृदयविकार आजाराचे निदान करण्यासाठी ‘टू-डी इको’ हे आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या टू-डी इको मशीनवर मंगळवारी हृदयाचा त्रास जाणवत असलेल्या ६० बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ३० बालकांमध्ये हृदयविकार असल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे या बालकांवर लवकरच मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या वेळी रुग्णांची तपासणी आचार्य विनोबा भावे रुग्णालय येथील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू गोमासे यांनी केली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी डॉ. शंतनू गोमासे यांचे रुग्णालयाच्या वतीने स्वागत केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडवू उपस्थित होते. तपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी आरबीएसके जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नीलेश पुनसे तसेच संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

टॅग्स :Amravatiअमरावती