अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट, विद्वत परिषद व अभ्यास मंडळ निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेह-यांची वर्णी लागली आहे. प्राचार्य, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, विद्यापीठ शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळाचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर झाला. मतमोजणीची प्रक्रिया २६ तास चालली.अधिसभेवर एस.सी. प्रवर्गातून अविनाश घरडे (यवतमाळ), डी.टी./एन.टी. प्रवर्गातून संजीव मोटके (पुसद), ओ.बी.सी. प्रवर्गातून अंबादास कुलट (अकोट), महिला गटातून संयोगिता देशमुख (अमरावती), तर सर्वसाधारणमधून संतोष ठाकरे (मूर्तिजापूर), नीलेश गावंडे (सिंदखेड राजा), राजेंद्र उमेकर ( अचलपूर), विजय ठाकरे (अमरावती), विनोद भोंडे (मंगरुळपीर) असे एकूण १० प्राचार्यांची वर्णी लागली आहेत. व्यवस्थापनाच्या सहा जागांमधून महिला गटातून मीनल ठाकरे (अमरावती), तर सर्वसाधारणच्या चार जागांवर विजयकुमार कोठारी (चिखली), वसंत घुईखेडकर (दारव्हा), दीपक धोटे (अमरावती), परमानंद अग्रवाल (नेरपरसोपंत) विजयी झालेत, तर एस.सी. प्रवर्गातून कीर्ती अर्जुन अविरोध निवडून आल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षकांच्या १० जागांपैकी एस.सी.प्रवर्गातून प्रफुल्ल गवई (चिखली), एस.टी. प्रवर्गातून आर.एम. सरपाते (अमरावती), डी.टी./एन.टी. प्रवर्गातून व्ही.डी.कापसे (चांदूररेल्वे), ओ.बी.सी. प्रवर्गातून सुभाष गावंडे (अमरावती), महिला गटातून अर्चना बोबडे (अमरावती), तर सर्वसाधारणमधून प्रदीप खेडकर, प्रवीण रघुवंशी (अमरावती), विवेक देशमुख (यवतमाळ), रवींद्र मुंद्रे (अकोला) हे विजयी झालेत.अधिसभेवर विद्यापीठ शिक्षक कोट्यातील एस.सी. प्रवर्गातून गजानन मुळे, महिला गटातून मोना चिमोटे व सर्वसाधारणमधून रवींद्र सरोदे विजयी झालेत. पदवीधरांमधून एस.सी. प्रवर्गातून भीमराव वाघमारे, एस.टी. प्रवर्गातून किरण परतेकी, डी.टी./एन.टी. प्रवर्गातून सुनील मानकर, ओ.बी.सी. प्रवर्गातून भैयासाहेब उपाख्य विद्याधर मेटकर, महिला प्रवर्गातून स्मिता इंगळे, तर सर्वसाधारणमधून अविनाश बोर्डे (अकोला), अमोल ठाकरे (अमरावती), दिलीप कडू (अमरावती), गजानन कडू व उत्पल टोंगो, (यवतमाळ) हे विजयी झालेत.विद्वत परिषदेत शिक्षक गटात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील एस.सी. प्रवर्गातून डी.टी. तायडे (अमरावती), सर्वसाधारणच्या एका जागेवर गजानन चौधरी (अमरावती), वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा शिक्षक वर्गवारीत सुभाष जाधव (वाशिम), ह्युमॅनिटीज विद्याशाखेतील शिक्षक गटात ओबीसी प्रवर्गातून ए.पी.पाटील (नांदगाव खंडेश्वर), सर्वसाधारणमधून ए.डी. चव्हाण (अमरावती) विजयी झालेत.अभ्यास मंडळ निवडणुकीतील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा गटात गणित अभ्यास मंडळामध्ये विजय मेटे (बडनेरा), वासुदेव पाटील (चिखलदरा), विलास राऊत, (दारव्हा) हे विजयी झालेत. प्राणिशास्त्र अभ्यास मंडळातून अभय पतकी (घाटंजी), रविकुमार गुल्हाने (कारंजा लाड), विजय भगत (अकोट), विज्ञान भाषा मंडळामध्ये विजय जाधव (वाशिम), मंगेश अडगोकर, (चांदूर बाजार), अभिजित अणे (वणी), इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळामध्ये नरेश जावरकर (पुसद), संजय गुल्हाने (यवतमाळ), प्रमोद पाटील (अमरावती), कम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंंग मंडळामध्ये गजेंद्र बमनोटे (बडनेरा), श्रीकांत सातारकर (अकोला), प्रदीप जावंधिया, (बुलडाणा), मीर सादीक अली (बडनेरा), सुधीर पारसकर व मिर्झा अन्सार बेग (शेगाव), अकाउंट अॅण्ड स्टॅटिस्टिक्स मंडळामध्ये संजय काळे (वलगाव, अमरावती), मनोज पिंपळे (भातकुली, अमरावती), प्रभाकर लढे (मलकापूर), बिझनेस इकॉनॉमिक्स मंडळामध्ये मुकुंद इंगळे (अकोला), प्रसाद खानझोडे (वणी), लोणारचे राजेंद्र बोरसे (लोणार, बुलडाणा), राधेश्याम चौधरी (पांढरकवडा), दिनेश निचत (वलगाव), सुभाष जाधव (वाशिम), वाणिज्य भाषा मंडळामध्ये संतोष ठाकरे (मूर्तिजापूर) मराठी विभागातून कमलाकर पायस, (अमरावती), श्रीकृष्ण काकडे (अकोला), इंग्रजी मंडळामध्ये किसन मेहरे (अकोला), किरण खंडारे (पातूर), नकुल गावंडे (अमरावती), मराठी मंडळामध्ये गजानन मुंदे (शेंदूरजना अढाव, वाशिम), भास्कर पाटील (अकोला), गणेश मालटे (चिखली), हिंदी मंंडळामध्ये संगीता जगताप (चिखलदरा), यादव मेंढे (अमरावती), संतोषकुमार गाजले (यवतमाळ), संगीत मंंडळामध्ये अभय गद्रे (खामगाव), स्नेहाशिष दास (अमरावती), चंद्रकिरण घाटे (पुसद) विजयी झालेत.इतिहास मंडळामध्ये संतोष बनसोड (बडनेरा), नितीन चांगोले (अमरावती), अशोक भोरजार (चांदूर बाजार), अर्थशास्त्र मंडळामध्ये संतोष कुटे (मेहकर), सुभाष गुर्जर (बुलडाणा), करमसिंह राजपूत (वणी), समाजशास्त्र मंडळामध्ये अरुण चव्हाण (अमरावती), अनिल ठाकरे (पिंजर, अकोला), बंडू किर्दक (बोरगाव मंजू, अकोला), गृहअर्थशास्त्र मंडळामध्ये संगीता जवंजाळ (अंजनगाव सुर्जी), संध्या काळे (अकोला), चांदूर बाजारच्या नीना चावरे (चांदूर बाजार) व फिजिकल एज्युकेशन अॅण्ड रिक्रिएशन मंडळामध्ये अमोल देशमुख (यवतमाळ), कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशनमध्ये अनिल चव्हाण (पुसद), निशा अर्डक (अमरावती) या विजयी झाल्यात.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अधिष्ठाता मनोज तायडे यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व लेखा अधिकारी शशिकांत आस्वले, विधी विभागप्रमुख विजय चौबे व गणित विभागप्रमुख एस.डी.कतोरे हे सदस्य असलेल्या समितीने व निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव अजय देशमुख यांच्या निरीक्षणाखाली मतमोजणीची प्रक्रिया २६ तास चालली.
अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक निकाल जाहीर, नव्या चेह-यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 6:03 PM