शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
2
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
3
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
4
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
5
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
6
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
7
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
8
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
9
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
10
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
11
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
12
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
13
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
14
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
15
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
16
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
17
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
19
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

अमरावती विद्यापीठाच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा १० एप्रिलपासून

By गणेश वासनिक | Published: April 04, 2023 3:58 PM

९९ हजार ७८७ परीक्षार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त, पाचही जिल्ह्यात १८३ केंद्रावर परीक्षांचे नियाेजन

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा १० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षांमध्ये ९९ हजार ७८७ बॅकलॉग विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून,अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यातील १८३ केंद्रावर परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.

उन्हाळी परीक्षांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाने दुसऱ्यांदा २६ ते ३१ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी दिली अहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाकडे नियमित विद्यार्थी १ लाख १८ हजार ८७४, तर बॅकलॉगच्या ९९ हजार ७८७ परीक्षार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. ३१ मार्च २०२३ ही ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लींक बंद करण्यात आली आहे. बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० एप्रिल ते ३ मे २०२३ या दरम्यान घेण्यात येणार आहे. ३० एप्रिल ते १० मे २०२३ या दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. तर नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ ते ३१ मे २०२३ या कालावधीत होणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी अशा शाखांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळी परीक्षांमध्ये आतापर्यंत सुमारे २ लाख १८ हजार ६६१ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज मिळाले आहे.

० एप्रिलपासून बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतील. त्याकरिता परीक्षा ऑफिसर्स, को-ऑफिसर्सच्या नियुक्त्या केल्या जातील. १८३ केंद्रावरील महाविद्यालयांमध्ये परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे. परीक्षा संचालनासाठी आवश्यक ती तयारी केली जात आहे.

- मोनाली वानखडे-तोटे, प्रभारी संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठexamपरीक्षाAmravatiअमरावती