- मनीष तसरेअमरावती- शहराचे झपाट्याने विस्तारीकरण होत आहे.लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे.यातच बेशिस्त वाहन पार्किंगमुळे व्यापार संकुलातील व्यापारी व मुख्य रस्त्यावरील दुकानदार यांची डोकेदुखी वाढली आहे.
शहरात दिवसेंदिवस वाहनांचा वाढता वापर पाहता पार्किंगची समस्या निर्माण होत आहे.शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना वाहने कुठे व कशी उभी करावी असा प्रश्न निर्मांण हाेतो.दुकानासमोर आधीच असताव्यस्त वाहनांची पार्किंग असल्यामूळे ग्राहकांना पार्किंग ची व्यवस्था नसते.यामूळे अनेकदा बाजारपेठेत वाद होतांना दिसतात.
अतिक्रमणामुळे शहरातील रस्त्याची अवस्था खडतर व जटील असतांना त्यात बेशिस्त पार्किंगमुळे नागरीकांना चालताना व दुचाकी पार्किंग करतांना मोठा त्रास सहन करावा लागतो.बेशिस्त पार्किंगमुळे चार वाहनांची जागा एकच वाहन घेते.या शिवाय शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.अनेकदा तर वाहनांना वळणसुध्दा घेता येत नाही.ही समस्या जयस्तंभ ते श्याम चौक तसेच राजकमल चौक ते गांधी चौका पर्यंत नेहमीच पहायला मिळते.
कर्कश आवाजाचा त्रासवाहन पार्किंग,खडतर रस्ते यासह शहरामध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शाळा परीसरासह हॉस्पिटलजवळही वाहनांच्या कर्णकर्शक आवाजामुळे रूग्णांना व नागरीकांना ध्वनिप्रदुषणाचा सामना करावा लागत आहे.एकंदरीत नागरीकांना रस्ते,पार्किंग,ध्वनी प्रदुषण यांसह अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.