शहरं
Join us  
Trending Stories
1
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
2
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
3
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
4
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
5
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
6
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
7
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
8
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
9
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
11
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
12
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
13
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
14
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
15
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
16
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
17
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
18
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
19
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
20
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'

अमरावतीत कर्जमाफीच्या याद्या अपलोड, प्रसिद्धीची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 4:36 PM

आयटी विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार जिल्ह्यातील कर्जदार एक लाख चार हजार शेतक-यांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

गजानन मोहोड/अमरावती- आयटी विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार जिल्ह्यातील कर्जदार एक लाख चार हजार शेतक-यांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे शेतक-यांना तात्पुरत्या पात्र स्वरूपातील याद्या प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील ७४९ सोसायटी व बँक शाखांच्या याद्या अपलोड करताना सहकार विभागाची चांगलीच दमछाक झाली आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या नावाच्या याद्या अपडेशनचे काम सहकार विभाग व जिल्हा बँकेद्वारा युद्धपातळीवर सुरू होते. यामध्ये शासन निकषानुसार पहिल्या टप्प्यात बँकांचे थकबाकीदार शेतक-यांमधून निकषपात्र लाभार्थी, दुस-या टप्प्यात पडताळणी करून निकषपात्र लाभार्थ्यांची यादी अपलोड करणे, तर तिस-या टप्प्यात सहकारी संस्थांसह इतर पदाधिकारी वगळून त्यांची नावे अपात्रतेच्या यादीत समाविष्ट करणे आदी प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती. जिल्हा उपनिबंधकांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ६६९ सेवा सहकारी सोसायटीज व जिल्हा बँकेच्या ८० शाखा अशा एकूण ७४९ संस्थांच्या पात्र एक लाख चार हजार २१८ लाभार्थ्यांच्या याद्या शनिवारी उशिरापर्यंत शासनाच्या आयटी विभागाकडे अपलोड करण्यात आल्या आहेत. 

राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्या त्या- त्या शाखांच्या मुख्य कार्यालयाद्वारा अपलोड करण्याची प्रक्रिया अखेरच्या चरणार आहे. याची एकीकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, सहकार विभागाची प्रक्रिया आटोपली असून व्यापारी बँकांची प्रक्रिया एक वा दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर एका आठवड्याच्या अवधीत तात्पुरत्या पात्र शेतक-यांची यादी आयटी विभागाद्वारा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गावनिहाय याद्या अपलोड करून सहकार विभाग व तालुकास्तरीय समिती या यादीची पडताळणी करणार आहे. शासनाच्या या घोळात शेतक-यांना मात्र नाहक प्रतीक्ष करावी लागत आहे.

कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतरही रक्कम जमा नाहीशासनाने दिवाळीच्या आदल्या दिवसी जिल्ह्यातील ३२ शेतक-यांना जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांचे हस्ते व एका शेतकºयाला मुंबईला मुख्यमंत्र्याचे हस्ते गौरविण्यात आले व त्यांना कर्जमाफ झाल्याविषयीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र प्रसिद्ध २३६ लाभार्थ्यांच्या हिरव्या यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांचे कर्ज अद्यापही माफ झालेले नाहीत. त्या यादीतील ग्रामीण बँकेच्या शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी ४१ लाखांचा निधी जमा झालेला आहे. मात्र जिल्हा बँकेच्या खातेदारांच्या कर्जखात्यात पैसे मात्र अद्यापही जमा झाले नसल्यामुळे त्यांची कर्जमाफी झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या ८० शाखा व ६६९ सेवा सहकारी सोसायटींच्या एक लाख चार हजार २१८ शेतक-यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या पात्र शेतक-यांच्या यादीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर तालुका समिती पडताळणी करेल.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक 

टॅग्स :Farmerशेतकरी