अमरावती : वलगाव रोड स्थित इकबाल कॉलनीत दोन उभ्या कारमधून पोलिसांनी ३६६ किलो गांजा जप्त केला होता. या गांजा तस्करी प्रकरणाचे तार आंध्र प्रदेशाशी जुळल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या अनुषंगाने पोलीस रेकॉर्डवरील अकबरनगर व गुलिस्तानगरातील दोघांचा शोध शहर गुन्हे शाखेचे पथक घेत आहेत. सदर आरोपी शहरातच लपवून बसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ३१ मार्च रोजी सकाळी वलगाव रोडवरील इकबाल कॉलनीत गांजाचे डिलिंग होणार होते. आरोपींनी एमएच ३१ सीआर ४४९४ व एमएच ३० एफ १९६८ या क्रमांकाच्या कारमध्ये ३६६ किलो गांजा अमरावतीत आणला होता. हा गांजा जिल्ह्याभरात विक्रीसाठी पाठविला जाणार होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून गांजासह कार जप्त केल्या.
अमरावतीच्या गांजा तस्करीचे धागेदोरे आंध्र प्रदेशशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:12 AM