बडनेरा : येथून पाच किलोमीटर अंतरावरील श्रीक्षेत्र कोंडेश्वरची ओळख प्राचीन देवस्थान म्हणून दूरवरपर्यंत आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे शिवभक्तांची अलोट गर्दी असते.रामदेव यादव व कृष्णदेवराय यादव ह्या घराण्यातील राजसत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान हेमाद्रीपंत यांनी अनेक मंदिरांचा त्या काळात जीर्णोद्धार केला. राजसत्तेच्या खर्चाने हेमाद्रीपंतांनीच कोंडेश्वराचे मंदिर बांधल्याचे पुरावे एका संस्कृत ग्रंथातून समोर आले आहे. म्हणून या मंदिराची ओळख प्राचीन देवस्थान म्हणून आहे. महाशिवरात्रीला याठिकाणी शिवभक्तांची मोठी गर्दी उसळलेली असते. या दरम्यान संस्थेकडून विविध धार्मिक कार्यक्रम घेतल्या जातात. कोंडेश्वराजवळ प्राचीन काळी अतिरूद्र, लघुरूद्र, एकादश्नीरूद्र, महीम्न आवर्तने, रुद्रयाग, कोटीलिंगार्चने झाल्याचा उल्लेख दप्तरी आहे. अतिपुरातन गणपती मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिरसुद्धा भाविकांंच्या भक्तीत भर पाडते. कैलास टेकडी, तुकडोजी महाराज पाझर तलाव, हत्तीचे कलात्मक व चमत्कारिक स्वरूप, भोजन कक्ष येथे येणाऱ्या भाविक भक्तांचे आकर्षण ठरते. महाशिवरात्रीला याठिकाणी यात्राच भरली आहे.
प्राचीन देवस्थान श्रीक्षेत्र कोंडेश्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 1:24 AM