लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यटन आणि बांधकाम खात्याचे राज्यमंत्री असलेले प्रवीण पोटे यांच्या येथील राठीनगरातील घरापुढे पाच महिलांनी बेशरमचे रोपटे ठेवून, साडी अन् बांगड्यांचा अहेर केला.बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा आणि पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यातील रस्त्याच्या श्रेयवादात साईनगर प्रभागाचे भाजप नगरसेवक तुषार भारतीय यांनी उडी घेतली. त्यानंतर चार दिवसांपासून राणा आणि भारतीय यांनी एकमेकांना आव्हाने-प्रतिआव्हाने दिलीत. भारतीय यांना सोमवारी दुपारी २ वाजता आ. राणा यांच्या निवासस्थानासमोर बेशरमचे झाड लावण्याचे जाहीर केले होते; तथापि भाजपजन राणा यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावण्यात अपयशी ठरले असतानाच, राणा यांच्या समर्थक महिलांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरासमोर कुंडीत बेशरमचे झाड ठेवून साडी-बांगड्यांचा आहेरही केला. राणा यांच्या घरासमोर लागावयाचे बेशरमचे झाड पालकमंत्र्यांच्या घरासमोर लागले.पोलीस आयुक्त बाविस्कर गाफीलवाद विकोपाला गेलेला असताना, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर हे गाफील राहिल्याने पालकमंत्र्यांच्या घराचीही सुरक्षा करण्यास ते असमर्थ ठरले. शहरात वाढलेला गुन्हेगारीचा आलेख आणि आता पालकमंत्र्यांचीच त्यांनी उडू दिलेली विकेट या बाबी पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाºया ठरल्या आहेत.पालकमंत्र्यांचा फोन बंदअपक्ष आमदार असलेले रवि राणा हे सत्ताधारी भाजपला पुरून उरले, अशी चर्चा या पार्श्वभूमीवर खुद्द भाजपच्याच गोटात होती. तुषार भारतीय यांनी जे केले, तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता, वैयक्तिक होता, अशा प्रतिक्रिया कट्टर भाजपजनांनी 'लोकमत'ला फोन करून दिल्या. घडलेल्या एकूणच प्रकरणाबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला असता, त्यांचे दोन्ही भ्रमणध्वनी बंद असल्याचे मेसेज ऐकू आले. भाजपक्षाने या मुद्द्यावर अधिकृत प्रतिक्रिया जारी केली नाही.
अन् बेशरमचे झाड लागले पालकमंत्र्यांच्या घरापुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:06 PM
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यटन आणि बांधकाम खात्याचे राज्यमंत्री असलेले प्रवीण पोटे यांच्या येथील राठीनगरातील घरापुढे पाच महिलांनी बेशरमचे रोपटे ठेवून, साडी अन् बांगड्यांचा अहेर केला.
ठळक मुद्देबांगड्या अन् साडीचा आहेरही : राणा समर्थक महिलांचा गनिमी कावा