आॅनलाईन लोकमतवरूड : येथील सती चौकात देशी दारूविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी बुधवारी महिलांचे मतदान घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मतदानात महिलाशक्ती कमी पडल्याने वरूडात बाटली आडवी झाली नाही, हे विशेष. दोन मतदान केंद्रांवर १ हजार ७०४ पैकी केवळ ४३५ मतदान झाले.सकाळपासूनच महिला मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने दुकान बंद होणार की सुरूच राहणार, अशी चर्चा होती. उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळाल्याने निकाल राखीव असेल, अशी चर्चाही रंगली होती. न्यू इंग्लिश मिडल स्कूलमध्ये सकाळी ८ ते ५ पर्यंत मतदान प्रक्रिया राबविली. यामध्ये ५० टक्के म्हणजे ८५३ मते आडव्या बाटलीला मिळाल्यास देशी दारूचे दुकान बंद होऊ शकते. मात्र, यापैकी दोन्ही मतदान केंद्रांवर ४३५ मतदान झाले. यातील उभ्या आणि आडव्या बाटलीला किती मते पडली, हे निकालाअंती कळेल. शहर दारुमुक्त व्हावे, यासाठी नगर परिषदेने तसा ठराव घेतला होता.ठाणेदार गोरख दिवे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ, एक्साइजचे निरीक्षक सुबोधकुमार केडिया, नायब तहसीलदार सहारे यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली.
अन् वरूडमध्ये बाटली आडवी झालीच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:01 PM
येथील सती चौकात देशी दारूविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी बुधवारी महिलांचे मतदान घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मतदानात महिलाशक्ती कमी पडल्याने वरूडात बाटली आडवी झाली नाही, हे विशेष.
ठळक मुद्देअल्प प्रतिसाद : दोन केंद्रांवर ४३५ मतदान