दर्यापूर : अज्ञात अपहरणकर्त्यांनी बोलेरो गाडीत बसवून आपले अपहरण केले. मला वाचवा, असा एसएमएस इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याने वडीलांना केला. हा एसएमएस मिळताच त्याच्या कुटुंबाची भंबेरी उडाली. त्यांनी लगेच दर्यापूर पोलीस ठाण्यात जाऊन झाला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. पोलीस खडबडून जागे झाले व शोधाशोध सुरु झाली. रात्रीला झालेल्या या प्रकारावर मंगळवारी पहाटे पडदा पडला. त्या मुलानेच स्वत:च्या अपहरणाचे नाट्य रचल्याचा प्रकार उजेडात आला. याबाबत पोलीस माहितीनुसार, स्थानिक जिन्नतपुरा येथील ऋषिराज संजय गुल्हाणे हा येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता अकरावीचा विद्यार्थी आहे. या महाविद्यालयात सध्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी तो दररोज सायंकाळी ५.३0 वाजता जात होता. नेहमीप्रमाणे तो सोमवारी सायंकाळी या प्रशिक्षण शिबिरासाठी गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी परत आलेला नव्हता. त्यामुळे घरच्या मंडळींना त्यांची चिंता लागली होती. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान रात्री १0.0५ वाजता ऋषिराजच्या मोबाईलवरुन त्याच्या वडीलांच्या मोबाईलवर एसएमएस धडकला. आपले अनोळखी लोकांनी अपहरण केल्याचा तो एसएमएस होता. आपल्या सोबत आणखी दोन मुलांचेही अपहरण केल्याचे त्याने एसएमएसने वडिलांना कळविले होते. मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच घरात गोंधळ उडाला. आईने हंबरडा फोडला. क्षणात घरातील वातावरण स्तब्ध झाले. ऋषिराजचे वडील संजय गुल्हाणे यांनी तत्काळ दर्यापूर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणाची कैफियत मांडली. मुलाचे अपहरण झाल्याचे ऐकून पोलीसही खडबडून जागे झाले. त्यांनी लगेच अपहरणाचा गुन्हा दाखल करुन शोधाशोध सुरु केली. याप्रकरणाचा तपास दर्यापूरचे ठाणेदार जे. के. पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केला.
अन् त्याने रचले स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य
By admin | Published: May 27, 2014 11:20 PM