लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऐकावे ते नवलच, असे म्हणण्याची वेळ यावी अशी एक घटना बुधवारी अमरावती शहरात उघडकीस आली. नागरिकांमध्ये ती घटना प्रचंड उत्सुकतेचा विषय तर ठरलीच, परंतु सामाजिक जीवनाचा आलेख किती रसातळाला जातो आहे, हेही त्यातून अधोरेखित झाले.त्याचे झाले असे की, शहरातील उच्चभ्रू वस्तीतील एक ३८ वर्षीय पुरुष आणि ३४ वर्षीय महिलेचा आनंदाने संसार सुरू होता. बुधवार, २२ जानेवारीचा दिवस या दाम्पत्यासाठी धक्कादायक आणि आयुष्याची दिशा बदलविणारा ठरला.बुधवारी सकाळी पत्नी पतीसोबत लाघवीपणे बोलत मैत्रिणीच्या लग्नात जायचे आहे, सायंकाळपर्यंत घरी परतेन, असे सांगून घरून निघाली. कुठलीही आडकाठी न घेता पतीरायानेही पत्नीला त्यासाठी संमती दिली. खरे तर पत्नी कधी घरून बाहेर पडते, याची पतीदेव प्रतीक्षाच करीत होते. पत्नी घरातून बाहेर गेल्याचे पाहून पतीने तात्काळ मित्राला कॉल केला. त्याच्याकडून एका कॉल गर्लचा मोबाइल क्रमांक मिळविला. तिला नियमित क्रमांकावरून त्याने संपर्क साधला. कॉल गर्लने कॉल स्वीकारला. केव्हा आणि कुठे यायचे, हे ठरले. त्यानंतर काही वेळातच कॉल गर्लचा पुन्हा कॉल आला. निश्चित पत्त्याबाबत ती विचारणा करीत होती. तिला पत्ता माहिती नसल्याचे समजून पतीदेवाने एक लँडमार्क भेटण्याचे ठिकाण ठरविले. वर्दळीचे ते ठिकाण आहे. दोघेही तेथे पोहोचले. एकमेकांचा शोध सुरू केला. स्कार्फ बांधून असलेली एक महिला फोनवर बोलत असल्याचे पाहून पतीदेव तिच्यापर्यंत पोहोचले. काय आश्चर्य! कॉल गर्ल म्हणून आलेली ती त्याची पत्नीच निघाली. दोघांमध्ये घमासान सुरू झाले. पत्नीच्या अशा वागण्यावर पतीने जोरदार आक्षेप घेतला. या कारणानेच तुम्ही मला बाहेर जाऊ दिले, असा आक्षेप पत्नीनेही नोंदविला. लोक जमले होते. गर्दी वाढत होती. दोघांमध्ये काय घडले, हे एव्हाना त्यांच्याच भांडणातून स्पष्ट झाले. कुणीच मागे हटत नव्हते. उपस्थितही वाद मिटविण्याऐवजी त्याचा आनंद घेत होते. दोघांचाही राग वाढत गेला. पतीने पत्नीचे केस ओढून तिला मारहाण केली. पत्नीनेही पतीला थापडांचा प्रसाद दिला. उच्चभू्र वस्तीत भर रस्त्यावरील हे नाट्य ज्या कारणासाठी घडत होते, त्या कारणावर अनेकांचा विश्वासच बसेना. मारून मारून दमल्यावर अखेर दोघेही घराच्या दिशेने निघून गेले. शाब्दिक चकमक मात्र जातानाही सुरूच होती. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची कुठेही तक्रार झालेली नव्हती.
अन् पत्नीच निघाली कॉर्ल गर्ल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:00 AM
बुधवारी सकाळी पत्नी पतीसोबत लाघवीपणे बोलत मैत्रिणीच्या लग्नात जायचे आहे, सायंकाळपर्यंत घरी परतेन, असे सांगून घरून निघाली. कुठलीही आडकाठी न घेता पतीरायानेही पत्नीला त्यासाठी संमती दिली. खरे तर पत्नी कधी घरून बाहेर पडते, याची पतीदेव प्रतीक्षाच करीत होते. पत्नी घरातून बाहेर गेल्याचे पाहून पतीने तात्काळ मित्राला कॉल केला. त्याच्याकडून एका कॉल गर्लचा मोबाइल क्रमांक मिळविला.
ठळक मुद्देपतीचा ‘तिला’ फोन : दोघांनीही दिला एकमेकांना चोप, लोकांची तोंडात बोटे