अमरावती : अंगणवाडीच्या इमारती बांधण्यासाठी देण्यात येणार्या अनुदानात शासनाने दीड लाख रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंगणवाडीच्या इमारतीच्या रखडलेल्या बांधकामाला आता गती मिळणार आहे. लहान मुलांना बालवयातच शिक्षणाची गोडी लागावी यासाठी जिल्ह्यात एक हजाराहून अधिक अंगणवाड्या उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून बर्याच अंगणवाड्यांना अद्यापही स्वत:च्या इमारती नाहीत. भाड्याच्या इमारतीमध्येच अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बांधकामासाठी लागणारे सिमेंट लोखंड विटा आदी साहित्यात मोठी वाढ झाली होती. मात्र वाढीव अनुदानामुळे ते शक्य होणार आहे.रखडलेल्या कामांना मिळणार गतीजिल्हा परिषद स्तरावर अंगणवाड्यांच्या इमारतीच्या बांधकामांना मान्यता दिली गेली तरीही ग्रामपंचायती मात्र बांधकाम परवडणारे नसल्याचे कारण देत होत्या त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर अंगणवाड्याचे बांधकाम रखडले होते. अनुदान वाढवून दिल्यामुळे रखडलेल्या कामाला गती मिळण्यास मदत होऊ शकते.दरम्यान अंगणवाडीचे रखडलेले बांधकाम पूर्ण करता यावे यासाठी राज्य शासनाने बांधकामासाठी साडेचार लाखाऐवजी सहा लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. याबाबत जिल्हा परिषदेला आदेश प्राप्त झाले आहेत. (प्रतिनिधी)
अंगणवाडीच्या अनुदानात दीड लाखांची वाढ
By admin | Published: June 05, 2014 11:41 PM