शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अंगणवाडीच्या पूरक आहारात ‘रुपयाची वाढ’

By admin | Published: January 12, 2016 12:26 AM

राज्यातील कुपोषित बालके व गर्भवती मातांना अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या दरात एक रुपयाने वाढ करण्यात आल्याची ...

महागाईत दिलासा : १० वर्षांनंतर कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रित नरेंद्र जावरे परतवाडाराज्यातील कुपोषित बालके व गर्भवती मातांना अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या दरात एक रुपयाने वाढ करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. रविवारी त्या अचलपूर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आल्या असता एक प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी उपरोक्त माहिती दिली. राज्यभरातील अंगणवाडी केंद्रातून ० ते ६ वयोगटातील सामान्य व कुपोषित बालकांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना पूरक पोेषण आहार दिला जातो. ४ रुपये ४२ पैसे दर अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाणार पूरक पोषण आहार चार रुपये बेचाळीस पैसे या दराने दिला जातो. प्रती लाभार्थी हा दर असून यामध्ये सकाळी मोट, चवळीची उसळ नास्ता म्हणून २८ ग्राम एवढी दिली जाते. तसेच ५९ ग्राम दाळ, १६ ग्राम तांदूळ, २८ गॅ्रम तेल, ६ ग्रॅम हळद , २ ग्रॅम मीठ, ४ ग्रॅम वाटाणा, २७ ग्रॅम, बालकांसाठी तर गर्भवती व स्तनदा मातांसाठी ७५ ग्रॅम दाळ, २०० ग्रॅम तांदूळ, ३८ ग्रॅम वाटाणा, ३७ ग्रॅममध्ये इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ५ रुपये ४२ पैसे, कमी वजनाच्या बालकांसाठी ६ रुपये ४२ पैसे दर आहे. ही योजना अधिक पारदर्शीपणे राबविण्यासाठी महिला व बालविकास विभागा कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.१० वर्षांपासून दर जैसे थे मेळघाटात १९९३ पासून कुपोषणाचा उद्रेक झाल्याचे उघडकीस आले. देशाच्या नकाशावर मेळघाटचा खरा चेहरा जगासमोर आला. कोट्यवधी रुपयांच्या योजना तयार करण्यात आल्या. त्यापैकी बोटावर मोजक्या योजनांची माहिती आदिवासींना आहे आणि त्यावरही कळस म्हणजे कुपोषणाचे नाव घेताच आरोग्याचा प्रश्न अंगणवाडी केंद्रावर लक्ष वेधणारा ठरतो. त्याच अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाणारा पूरक पोषण आहार महागाईच्या काळात अल्प प्रमाणात दिला जात असून किमान १० वर्षापेक्षा अधिक काळानंतर एक रुपयांची वाढ त्यात करण्यात आली आहे. या महागाईत हा रुपया दिलासा देणारा ठरणार आहे. अंगणवाडी केंद्रही कुपोषित शासनाने अंगणवाडी केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी पाठविला असला तरी चिखलदरा तालुक्यातील एकूण २३२ अंगणवाडी केंद्र असून ९६ अंगणवाडी केंद्र शाळा व समाज मंदिरामध्ये चालविण्यात येत आहेत. परिणामी अंगणवाडी केंद्राची परवड १९९२ पासून आजपर्यंत सुरुच आहे. युनिसेफच्या तत्त्वानुसार आहार- पंकजा मुंडे अंगणवाडी केंद्रातून कुपोषित व सामान्य बालकांप्रमाणेच स्तनदा व गर्भवती मातांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दरात एक रुपयांची वाढ डिसेंबर महिन्यात करण्यात आली आहे. कुपोषित व सामान्य बालकांना युनिसेफ या जगातीक संघटनेच्या दिशानिर्देशानुसार आहार व इतर पुरवठा केला जात असल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.