असाईमेंट
अमरावती : अंगणवाडी सेविकांना माहिती देण्यासाठी मोबाइल देण्यात आले आहेत. या मोबाइलमध्ये संपूर्ण डाटा इंग्रजीमधला आहे. यामुळे गावपातळीवरच्या अंगणवाडी सेविकांना माहिती भरणे अवघड होत आहे. यामुळे सेविकांनी आपला मोबाइल परत केला आहे.
आता मोबाइल परत झाल्याने त्यामध्ये असलेली संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना रजिस्टरवर माहिती लिहावी लागत आहे. आयुक्तांनी मोबाइल परत घेऊन जा, असा आदेश काढला आहे. तर अंगणवाडी सेविका जोपर्यंत मराठी ॲप होणार नाही, तोपर्यत मोबाइल परत नेणार नाही, या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे अंगणवाडीचे कामकाज करताना दोन्हीकडे कामाचा ताण वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कामांचा व्याप यापूर्वी मराठी साॅफ्टवेअर होते. मध्यंतरी त्यात बदल झाला संपूर्ण काम मोबाईलवर असल्याने रजिस्टरवर होणाऱ्या नोंदी थांबल्या होत्या. आता मोबाईल परत केल्याने अंगणवाडी सेविकांना संपूर्ण माहिती भरताना विविध अडचणी येत आहेत. लाभार्थ्याचे नाव शोधणे, त्यांना किती वाटप झालं याच्या नोंदी कळविणे. यातून कामाचा व्याप वाढला आहे.
कोट
अंगणवाडीना ॲप मराठीतील हवा होता. त्यामुळेच मोबाईल परत करण्यात आले. याशिवाय अनेकांचे मोबाईल खराब झाले होते. वारंवार हँग होत होते. यानंतरही ते दुरुस्त करून मिळाले नाही. अनेक मोबाईल दुरुस्त केल्यानंतर अंगणवाडी सेविकांना स्वत:च बिल भरावे लागले. आता माहिती भरताना विविध अडचणी येत आहेत.
- माया पिसाळकर,
अंगणवाडी सेविका
कोट
मोबाईल नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. आम्हाला रजिस्टरवरून नंतर माहितीचा अहवाल तयार करावा लागत आहे. नव्याने १४ रजिस्टर त्यासाठी भरावे लागत आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका ही इंग्रजी शक्य नाही. यामुळे मराठी साॅफ्टवेअर आणि नवीन मोबाईल यासाठी आग्रही आहोत.
- मिरा कैथवास,
अंगणवाडी सेविका
कोट
अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या संघटनांच्या सुचनांनुसार अंगणवाडी सेविका यांनी मदन मोबाईल परत केले होते. परंतु राज्य स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन हा मुद्दा निकाली निघाला. सध्या अंगणवाडीसेविका कडे सर्व मोबाईल आहेत आणि त्याप्रमाणे त्या काम करीत आहेत.
- कैलास घोडके, महिला व बाल कल्याण विभाग अधिकारी अमरावती
बॉक्स
म्हणून केला मोबाईल परत मोबाईल ॲपमध्ये संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये होती. त्यामुळे माहिती भरताना अडचणी येत होत्या. तीन वर्षांचा कालावधी संपल्याने अनेक मोबाईल बिघडले आहेत. ते वारंवार हँग होत होते. बिघाड झाल्याने मोबाईलवर कामच करता येत नव्हते. यामुळे अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केला होता.
बॉक्स
अंगणवाडी सेविका -२६४३
जणींनी केला मोबा्ईल परत -२६४३
जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या-२६४३