दिलासा : महिला, बालकल्याणमंत्र्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा अमरावती : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१६ पर्यंतच्या थकबाकीसह मानधनात वाढही मिळणार आहे. याकरिता महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांकडून मंजूर करून घेतली. त्यानुसार ११३ कोटी ३९ लाख रूपयांचा निधी देण्याचे वित्त मंत्र्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.के.जाधव यांनी सांगितले.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनादेशानुसार मानधनात वाढ व इतर मागण्यांसाठी आयटकप्रणित अंगणवाडी बालवाडी, कर्मचारी युनियनने ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित नसल्याने प्रलंबित मागण्यांवर ४ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्य शासनामार्फत दिले होते. त्यानुसार १५ डिसेंबर रोजी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व महिला बालकिास मंत्री यांनी मुख्यमंत्री व वित्मंत्री यांची भेट घेऊन पुरवणी मागणी मंजूर करून घेतली. अंगणवाडी सीविकेला ९५० व मदतिनिसाना ५०० तर मिनी अंगणवाडी सेविकांना ५५० रूपये याप्रमाणे १ एप्रिल २०१४ पासून मानधन वाढीकरिता ११३ कोटी ३९ लाखांचा निधी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. जानेवारी २०१६ पर्यंतची थकबाकी देण्याची व्यवस्था शासनामार्फत केली जाणार आहे. सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तामिळनाडू राज्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी. ३३ महिला खासनारांनी सुचविलेल्या पार्लमेंटरी शिफारसीची त्वरित अंमलबजावणी करावी. पेन्शन एकरकमी योजनेत सेविकांना २ लाख व मदतनिस, अंगणवाडी, मिनीअंगणवाडी सेविकांना १.५० लाख रूपये द्यावे. तसेच जिल्हा परिषद व नगरपरिषदे प्रमाणे अंगवाडी कर्मचाऱ्यांना सुटट्या द्याव्यात. आजाराची पगारी सुटी व खर्च तसेच उन्हाळी सुटी १५ दिवसांऐवजी दरवर्षी एक महिन्याची पगारी रजा द्यावी आदी माण्यांबाबत लवकरच बैठक घेऊन उर्वरित मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. संघटनेचे अध्यक्ष जाधव,अरूणा देशमुख, मिरा कैथवास, माया पिसाळकर, चंदा गायकवाड, रेखा नवरंगे, रमा प्रभे, सुभद्रा भोयर, मालती देशमुख, नजिमा काजी, आशा टेहरे, रंजना धोटे, संगिता लकडे, संध्या कापसे, माया टेंभूर्णे यांनी कळविले.
नव्या वर्षात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकबाकीसह मानधनवाढ
By admin | Published: December 26, 2015 12:24 AM