लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्य शासनाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ आयटकप्रणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा मंगळवारी जिल्हा कचेरीवर काढण्यात आला. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून जाहीर केलेली मानधनवाढ राज्यात त्वरित लागू करण्यात यावी. समायोजनाच्या नावाखाली अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा प्रकार बंद करावा. एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे खासगीकरण करू नये. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात. सध्या मिळणाऱ्या सेवासमाप्ती मानधनात भरीव वाढ व्हावी, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी बी.के. जाधव, ममता सुंदरकर, प्रमिला चिखलकर, मीरा कैथवास, रत्नमाला ब्राम्हणे, उज्ज्वला गुळांदे, रेखा नवरंगे, वैजयंती जोशी, वंदना भोपसे, रमेश सोनुने, साफीया खान, प्रतिभा शिंदे, पद्मा गजभिये, चंदा वानखडे, सुमित्रा हिवराळे, रंजना धोटे, माया पिसाळकर, चंदा गायकवाड, वृषाली तापस, आशा टेहरे, प्रमिला भांबुरकर, रमा प्रभे, रेखा ठाकूर, अरुणा देशमुख यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. मागण्या मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
अंगणवाडी कर्मचारी जिल्हा कचेरीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:03 PM
केंद्र व राज्य शासनाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ आयटकप्रणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा मंगळवारी जिल्हा कचेरीवर काढण्यात आला. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
ठळक मुद्देशासनाला निवेदन : मानधनवाढ राज्यात लागू करण्याची मागणी