शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अंगणवाडी सेविकांना आता दहा हजार रुपये मानधन; साडेचार हजारावर कर्मचाऱ्यांना लाभ

By जितेंद्र दखने | Published: April 06, 2023 6:56 PM

अंगणवाडी सेविकांना आता दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. 

अमरावती : मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलने करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने १ एप्रिल पासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील २ लाख ७९ हजार ९१६ कर्मचाऱ्यांना होणार आहे, तर यामध्ये अमरावती जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ७५३ अंगणवाडी सेविका, मदतनिस कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

मानधनवाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे राज्य सरकारने अखेर त्यांच्या मानधनांमध्ये वाढ केली. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार २०० आणि अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० मानधन देण्यात येणार आहे.

२३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णय यात नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार देण्यात येणारी ही वाढ कायम ठेवण्यात येत आहे. असे महिला बाल विकास विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील १४ प्रकल्प अंतर्गत२४९६ पैकी आजघडीला २३७८ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. २ हजार ११० मदतनीस व १४७ मिनी अंगणवाडी सेविका असे एकूण ७ हजार ७५३ मानधनावर कर्मचारी कार्यात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांच्या मानधनात वेळोवेळी वाढ करण्यात येते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी केंद्र सरकारचा हिस्सा ६० टक्के व राज्य सरकारचा ४० टक्के असे प्रमाण आहे. मानधन वाढ अशी रुपयांमध्ये

  • कर्मचारी सध्याचे मानधन सुधारित मानधन
  • अंगणवाडी सेविका -८३२५ -१००००
  • मिनी अंगणवाडी सेविका- ५९७५-७२००
  • अंगणवाडी मदतनीस- ४४२५-५५००

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वेळोवेळी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत यांच्या मानधन वाढीची मागणी शासनाने पूर्ण केली असून यामुळे अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ झालेली आहे. यामुळे त्यांच्यामध्ये निश्चितच आणखी चांगले काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होईल याबाबत कोणतीही शंका नाही. - डॉ कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

 

टॅग्स :Amravatiअमरावती