लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात मेळघाट सेल तत्पर असून मेळघाट सेलच्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरात ५९६ आदिवासी रुग्णांना रक्तपुरवठा करून योग्य आरोग्य सेवा पुरविली आहे. दुर्गम भागातून अमरावतीत आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करणे व डिस्जार्च होईपर्यंत त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी मेळघाट सेल योग्यरित्या बजावीत आहे. त्यामुळे या रुग्णांसाठी मेळघाट सेल देवदूत ठरले आहे.आदिवासी महिला, पुरुष व लहान मुलांना आरोग्य सेवेची आवश्यकता भासल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवा पुरविली जाते. जिल्ह्यात टेंभुरसोडा, चिखलदरा, सलोना, सेमाडोह, चुरणी, काटकुंभ, हतरू, धारणी, हरीसाल, कलखा, सादरवाडी, धुलघाट व बैरागट या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आवश्यक असल्यास तेथील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येते. त्यासाठी आदिवासी बांधवांना १०८ रुग्णवाहिकेची सुविधा पुरविली जाते. इर्विन रुग्णालयात रुग्ण दाखल केल्यानंतर त्याची योग्य व्यवस्थेची जबाबदारी मेळघाट सेल स्वीकारते. आदिवासी नागरिकांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असल्याचेही अनेकदा आढळून येते. अशा रुग्णांना रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी मेळघाट सेल सांभाळते. जानेवारी ते डिसेंबर २०१७ मध्ये महिला,पुरुष व लहान मुले अशा ५९६ रुग्णांना मेळघाट सेलकडून रक्त पुरवठा केला आहे. त्यामध्ये १९१ मुले, १३० पुरुष व २७५ महिलांचा समावेश आहे. याशिवाय २०१८ मधील पाच महिन्यात शंभरावर रुग्णांना रक्त पुरविले गेले आहे. काही वेळात रक्ताची कमतरता भासते, अशावेळी मेळघाट सेल खासगी रक्तपेढीतूनही आदीवासींसाठी रक्त आणणात.यांचे कार्य महत्त्वाचेमेळघाटातील आरोग्य केंद्रात डॉक्टर व परिचारिका आदिवासींना योग्यरीत्या आरोग्य सेवा पुरवितात. त्यानंतर इर्विनमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना सर्व सुविधा देण्याचे काम मेळघाट सेल करते. पर्यवेक्षक ईमला मावस्कर, समन्वयक शामू दारसिंम्बे, सुनील कास्देकर, संदीप कथे, अविनाश डवरे, शंकुतला कास्देकर यांचे कार्य महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
मेळघाट सेल ठरला आदिवासींसाठी देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:05 IST
मेळघाटातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात मेळघाट सेल तत्पर असून मेळघाट सेलच्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरात ५९६ आदिवासी रुग्णांना रक्तपुरवठा करून योग्य आरोग्य सेवा पुरविली आहे.
मेळघाट सेल ठरला आदिवासींसाठी देवदूत
ठळक मुद्देहजारांवर रुग्णांना आरोग्य सेवा