लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भौतिक सुविधांचा अतिरेक वाढत चालला असता मनुष्यप्राण्यात असुरक्षिततेची टोकाची भावनाही बळावली आहे. समोरचा व्यक्ती आपल्याला समजावण्यासाठी आला की अन्य उद्देशाने हे न समजून घेण्याइतपत ही भावना टोकदार झाली आहे. कंवरनगरमध्ये रविवारी दुपारी झालेले अनिल अडवाणी हत्याप्रकरण तीच असुरक्षिततेची भावना अधोरेखित करणारे ठरले आहे.शनिवारी रात्री कंवरनगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये हत्येचा थरार उघड झाला. क्षुल्लक कारणावरून अनिल अडवाणीला प्राण गमवावे लागले, तर त्याचे वडील नारायण व शेजारी राहणारा तरुण किंगर हा इसम गंभीर जखमी झाला. शनिवारी उभय कुटुंबात लहान मुलांच्या वादानंतर महिलांमध्ये तूतू-मैमै झाली. तो वाद निवळला. रात्रीच्या सुमारास अनिल व आनंद हे दोघे घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नींनी सकाळचा वाद त्यांच्या कानावर घातला. कंवरनगरात व्याजबट्ट्याचा व्यवसाय करणाऱ्या आनंद बुधलानीची दहशत होती. त्यामुळे त्याच्याविरोधात जाण्याचे कोणात धाडस नव्हते. मात्र, शनिवारी रात्री अनिल मोठ्या हिमतीने आनंदला विचारणा करण्यास गेला. घराबाहेर उभा राहून आनंदला आवाज देऊ लागला. आनंद त्यावेळी घरातील आतील खोलीत होता. आनंदची पत्नी बाहेर आली आणि अनिल घरासमोर असल्याचे तिने सांगितले. सकाळच्या वादातून अनिल तुम्हाला मारण्यासाठी आल्याचे पत्नीने आनंदला सांगितले. त्यामुळे आनंद मागचा-पुढचा विचार न करता चाकू घेऊन बाहेर पडला. नेमके काय झाले, हे न सांगता, न विचारता त्याने अनिलवर थेट चाकूने हल्ला चढवला. अनिलला वाचविण्यासाठी गेलेले वडील नारायण अडवाणी व शेजारी राहणारे तरुण किंगरसुद्धा आनंदच्या हल्ल्यात जखमी झाले. अनिलला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यावर तेथे मृत घोषित केले. शहरात घडणाऱ्या हत्येच्या बहुतांश घटना मद्यधुंद अवस्थेत, रागाच्या भरात किंवा द्वेषभावनेतून होतात. याशिवाय तुरळक काही घटना संपत्तीच्या वादातून योजनाबद्धरीत्या होत असल्याचे विश्लेषक सांगतात. मात्र, आपल्याला जिवे मारण्यासाठीच आल्याच्या गैरसमजुतीतून आनंदने अनिलची हत्या केल्याची बाब पुढे आली आहे. पोलीस चौकशीत आनंदने पश्चात्ताप व्यक्त करीत खुनाची कबुली दिली आहे. पोलीस यंत्रणाही या घटनेने हतबद्ध झाली आहे.४ आॅक्टोबरपर्यंत कोठडी, चाकू, कपडे जप्तहत्येनंतर आरोपी आनंद बुधलानीला अकोली रेल्वेस्थानकाहून राजापेठ पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ४ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सोमवारी आनंद बुधलानीने गुन्ह्यात वापरलेला चाकू व परिधान केलेले कपडे जप्त केले आहेत.आरोपीला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याच्याकडून चाकू व कपडे जप्त केले आहे. गैरसमजुतीतून ही हत्या केल्याचे तो सांगत असून,त्याने गुन्ह्याची कबुली दिलीआहे.- स.ई. तडवीदुय्यम पोलीस निरीक्षक,राजापेठ ठाणे.
असुरक्षिततेच्या भावनेतून आनंदने केली अनिलची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:30 PM
भौतिक सुविधांचा अतिरेक वाढत चालला असता मनुष्यप्राण्यात असुरक्षिततेची टोकाची भावनाही बळावली आहे. समोरचा व्यक्ती आपल्याला समजावण्यासाठी आला की अन्य उद्देशाने हे न समजून घेण्याइतपत ही भावना टोकदार झाली आहे. कंवरनगरमध्ये रविवारी दुपारी झालेले अनिल अडवाणी हत्याप्रकरण तीच असुरक्षिततेची भावना अधोरेखित करणारे ठरले आहे.
ठळक मुद्देगैरसमज बेतला जिवावर : कंवरनगर येथील अनिल अडवाणी हत्याप्रकरण