अमरावती : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून जनावरांना फऱ्या, घटसर्प, आंत्रविषार रोग होऊ नयेत, यासाठी पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने गत दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे.
पावसाळ्यात घटसर्प, फऱ्या हे रोग जनावरांना होऊ नयेत, यासाठी काळजी घेतली जाते. गत काही दिवसांपासून ग्रामीण भागात पशुधनासाठी घटसर्पाची ३ लाख, तर आंत्रविषारची १ लाख ६० हजार लस प्राप्त झाली आहे. याद्वारे जिल्ह्यातील पशुधनाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात घटसर्प व फऱ्या या रोगांनी डोके वर काढू नये, यासाठी जनावरांना ही लस पावसाळ्यापूर्वी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील जनावरे निरोगी राहावीत, त्यांना कोणताही रोग होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. घटसर्प हा दुधाळ जनावरांना होणारा रोग आहे. हा रोग म्हैसवर्गीय जनावरांना जास्त होतो. त्यामुळे खबरदारीच्या अनुषंगाने ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
तीन वर्षांत तरी घटसर्प झाला नाही.दरवर्षी पावसाळ्यात घटसर्प व फऱ्या आजाराची लस जनावरांना दिली जाते. या आजारांबाबत जनावरांची काळजीही घेतली जाते व तशा सूचना पशुपालकांना केल्या जातात. गत तीन वर्षांत एकाही जनावराला घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार हा रोग झाला नाही. तो रोग होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पावसाळ्यापूर्वीच जनावरांचे लसीकरण केले जात आहे. असा झाला लसीचा पुरवठा
- घटसर्प -३ लाख
- आंत्रविकार - १ लाख ६० हजार
- एकूण पुरवठा - ४ लाख ६० हजार
जिल्ह्यातील पशुधन
- शेळ्या - ३ लाख १२ हजार ८८९
- मेंढ्या - ८२ हजार ६०३
- म्हैसवर्ग - १ लाख २८ हजार ५८६
- गायवर्ग - ४ लाख ६२ हजार २३
- एकूण - ५ लाख ९४ हजार ५९४
जनावरांना लसीकरण करावेजिल्ह्यात घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार ही लस पशुधनाला दिली जात आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे व जनावरांना निरोगी ठेवावे. - डॉ. पुरुषोत्तम सोळंके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी