लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील देवरी निपाणी येथे २८ जुलै रोजी रोहीने धुमाकूळ घालून गावातील पाच जनावरांना चावा घेतला. त्याचा सोमवारी सकाळी १० वाजता गावातच मृत्यू झाला. २४ तासांत गावकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही.आष्टीनजीक देवरी निपाणी गावात पावसामुळे रविवारी दुपारी १२ वाजता अचानक रोही शिरला. श्वानांनी रोहीचा पाठलाग केला. दरम्यान नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावले आणि रोहीलादेखील हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, उलट तो अंगावर येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्याने गावातील चार ते पाच जनावरांनादेखील चावा घेतला. घाबरलेल्या नागरिकांना याची माहिती पोलिसांना दिली. गावात पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनीदेखील वनविभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी १० वाजता थंडी व पावसात गारठ्याने रोहीचा गावातच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्याचे धड शेतात नेऊन टाकले.वनविभागाकडून दखल नाहीपोलीस, ग्रामस्थांनी वनविभागाच्या परिचित कर्मचाऱ्यांना फोन लावले तसेच १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावरूनदेखील मदत मागविली. तथापि, वनाधिकाºयांकडून प्रतिसाद मिळाला नाही. जखमी रोहीला पाणी पाजण्याची तजवीज नागरिकांनी केली. तथापि, रोहीने प्रतिसाद दिला नाही. वनविभागाचे पथक वेळीच गावात दाखल झाले असते, तर त्याचे प्राण वाचविता आले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत.
पशूंना चावा घेणारा रोही दगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:06 PM
भातकुली तालुक्यातील देवरी निपाणी येथे २८ जुलै रोजी रोहीने धुमाकूळ घालून गावातील पाच जनावरांना चावा घेतला. त्याचा सोमवारी सकाळी १० वाजता गावातच मृत्यू झाला. २४ तासांत गावकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही.
ठळक मुद्देदेवरी येथील घटना : वनविभाग ‘नॉट रिचेबल’