शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

अंजनगावचा लाचखोर ‘पीएसआय’ जेरबंद

By admin | Published: March 05, 2016 12:10 AM

गुन्ह्यातील कलम हटविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाला गुरुवारी रात्री रंगेहात पकडण्यात आले.

पाच हजारांची लाच : एसीबीची कारवाईअंजनगाव सुर्जी : गुन्ह्यातील कलम हटविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाला गुरुवारी रात्री रंगेहात पकडण्यात आले. छत्रपती भिकाजी धावट (५६) असे या उपनिरीक्षकाचे नाव असून तो अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री १०.३५ मिनिटांनी ही कारवाई केली. अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात भादंविच्या कलम ३१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील कलम ३९२ हटविण्यासाठी व तक्रारकर्त्याचा मित्र असलेल्या अमोल तायडे याला गुन्ह्यातून काढण्यासाठी पाच हजार रूपये आणि चार्जशिट दाखल केल्यानंतर ७५०० रूपये अशा एकूण १२,५०० रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला होता. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. प्रवेशद्वाराजवळ अटकअमरावती : एसीबीच्या पथकाने गुरुवारी अंजनगाव सुर्जी गाठून तक्रारीची पडताळणी केली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक छत्रपती धावट याने अमोल तायडे याचे नाव गुन्ह्यातून काढल्याची कागदपत्रे दाखवीत पाच हजार रुपये लाच मागितली. रक्कम स्वीकारताना त्याला ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ अटक केली गेली. एसीबीचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे, एएसआय कैलास सानप, अक्षय हरणे, सय्यद ताहेरअली, धीरज बिरोले, अकबर हुसेन यांनी ही कारवाई केली. अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, उपअधीक्षक आर.बी.मुळे यांनीही या कारवाईत मार्गदर्शन केले.