अमरावती: जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. अगोदर मृत्यू नंतर कोरोना संक्रमित असल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले होते. हाथीपुरा येथील ४५ वर्षीय व्यक्तींचे घरीच निधन झाले होते. मुमताज ऑटोवाला असे पहिल्या कोरोना रुग्णाचे नाव आहे.
जिल्ह्यातील पहिल्या कोरोना ‘हाेमडेथ’च्या कुटुंबातील २४ सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. हे सर्व जण आता ठणठणीत बरे झाले आहेत. या सर्व सदस्यांकडून कुटुंबीयांसह इतरांचीही काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, आरोग्य यंत्रणेला मोठे सहकार्य या कुटंबाकडून मिळत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.
कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार होण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने खासगी व सरकारी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड केअर आराेग्य केंद्र तर डेडिकेडेट कोविड हाॅस्पिटल असे एकूण ४५ दवाखाने उपलब्ध केले आहेत.
----------------
४ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यातील पहिला रुग्ण कोरोनाबाधित आढळला आला
कोरोनाचे एकूण रुग्ण : ४९ हजार ५२३
बरे झालेले रुग्ण : ४५ हजार ५४४
एकूण कोरोनाचे बळी : ६८६
सध्या उपचार सुरू असलेले : ३२९३
कोविड सेंटर्स : ४५
---------------
असे वाढले रुग्ण
एप्रिल २०२० - ४०
मे- १७८
जून - ३४६
जुलै- १५९३
ऑगस्ट - ३४६३
सप्टेंबर - ७७१३
ऑक्टोबर- २९६९
नोव्हेंबर - १५८४
डिसेंबर- १७८२
जानेवारी २०२१- २२१९
फेब्रुवारी- १३२३०
मार्च- १३५१८
--------------------
पुरेसा औषधसाठा
जिल्ह्यात २६ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, १५ कोविड केअर आराेग्य केंद्र तर चार डेडिकेडेट कोविड हाॅस्पिटल कार्यरत आहे. कोरोना संक्रमित रुग्णांवर ४५ ठिकाणी उपचार सुरू आहेत. या सर्व खासगी, सरकारी दवानखान्यात आयसीयू, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर आणि जनरल बेडसह औषधीसाठा पुरेसा असल्याची माहिती आहे. तसेच कोरोना रुग्णांंवर होणाऱ्या उपचारदरावरही जिल्हा प्रशासनाने नियंत्रण चालविले आहे.
----------------
कोरोना रुग्णांच्या संख्येत कोविड सेंटर्स पुरेसे
जिल्ह्यात ४५ कोविड सेंटर्स असून येथे एकूण २९५१ बेडसंख्या आहे. हल्ली ७८१ रुग्ण कोविड सेंटर्समध्ये उपचार घेत आहेत. २१७० बेड अद्यापही शिल्लक आहेत. रुग्णांच्या तुलनेत कोविड सेंटर्स पुरेसे असल्याचे वास्तव आहे. दरदिवशी आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सौम्य असल्याचे दिसून येते.
-----------------
-----------------
दुसरा पॉझिटिव्ह कुटुंबीयांची जबाबदारी हाताळतोय
१) जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयातील २४ सदस्यांना पीडीएमसीत क्वांरटाईन करण्यात आले. त्यापैकी चार जण संक्रमित आढळून आले होते.
२) चार पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना येथील सुपर स्पेशालिटी कोरोना रुग्णालयात उपाचासाठी दाखल केले होते. यात मृत संक्रमिताची पत्नी, दोन भाऊ व मुलाचा समावेश होता.
३) मृत संक्रमिताचा भाऊ ठणठणीत आहे. तो एकूणच कुटुंबीयांची काळजी घेतो. ऑटोरिक्षा चालवून कुटुंबीयांचा गाडा हाकत आहे.