शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

बोंडअळीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:27 AM

बोंडअळीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातूनच त्याला आर्थिक फटका बसत असल्याने शासनातर्फे अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मदत दिली जात नाही. यामुळे बोंडअळीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी आ. बच्चू कडू यांनी केली. ते येथे आयोजित तालुकास्तरीय शेतकरी शेतमजूर कार्यशाळेत उद्घाटक म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देबच्चू कडू यांची मागणी : परतवाड्यात शेतकरी, शेतमजुरांसाठी कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बोंडअळीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातूनच त्याला आर्थिक फटका बसत असल्याने शासनातर्फे अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मदत दिली जात नाही. यामुळे बोंडअळीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी आ. बच्चू कडू यांनी केली. ते येथे आयोजित तालुकास्तरीय शेतकरी शेतमजूर कार्यशाळेत उद्घाटक म्हणून बोलत होते.मंचावर पंचायत समिती सभापती देवेंद्र पेठकर, उपसभापती सोनाली तट्टे, जि.प. सदस्य प्रताप अभ्यंकर, पार्वती काठोळे, प्रवीण हरणे, कविता बोरेकर, श्रीधर काळे, सुनील तायडे, आशा धामणकर, बीडीओ जयंत बाबरे, जिल्हा कृषी अधिकारी, विजय चवाळे तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, राम देशमुखसह मान्यवर मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी शेतमजूर उपस्थित होतेपुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की नव नवीन तंत्रज्ञानानुसार शेतक?्यांनी प्रयोग करीत ते आत्मसात करण्याची गरज आहे ,सुशिक्षित आणि अज्ञान अशा दोन शेतकऱ्यांचे गट प्रत्येक गावात निर्माण करून सुशिक्षित शेतकºयांनी इतर शेतकºयांना नैसर्गिक आपत्ती बोंडआळी विविध प्रकारचे शेतीवर होत असलेली लागण त्यासाठी करावयाचे उपायोजना आदीबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.बोंडआळीसह संत्रा फळावर होत असलेल्या विविध प्रकारच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात बळीराजा संकटात सापडला आहे. त्यावर करावयाच्या उपाययोजनांचे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले. तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाच्यावतीने शेतकरी, शेतमजूर तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल, मनोहर अग्रवाल, सचिव मनोज उपाध्याय, किसन शर्मा, घनश्याम अग्रवाल, महेंद्र उपाध्याय, मुकेश महल्ले, स्वप्निल लहाने, नीलेश भोंडे, राजू कुंजर, दिनेश काळे, अतुल देवघरे, अनूप गावंडे व तालुक्यातील सर्व कृषी केंद्राचे संचालक उपस्थित होते....पाह्यजा ताटात बोंडअळी निघीन !शेतकरी शेतमजूर कार्यशाळेसाठी आलेल्या उपस्थितांसाठी आयोजकांच्यावतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कपाशीवर बोंडअळी आणि संत्राफळावर कीड यामुळे शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे रात्रंदिवस डोक्यात बोंडअळी आणी कीड याचे स्वप्न पडू लागल्याचे एका शेतकºयाने सांगितले. कार्यक्रमात आलेले शेतकरी जेवताना एकमेकांना 'पाह्यजा ताटात बोंड अळी निघीन' असे मिश्किलपणे सांगून ओढवलेल्या संकटाची प्रचिती एकमेकांना करून देत होते. मात्र, त्यातून प्रचंड खसखस पिकत होती.अन् साखरपुड्याचा चहा संपलाशेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय कार्यशाळा धारणी रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर मंगल कार्यालय दोन भागांत असल्याने एका भागात कार्यशाळा, तर दुसºया भागात शहरातील एका परिवाराचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर आणि गर्दी केली अशातच मधातील अटक उघडल्याने साक्षगंधासाठी असलेला पाहुण्यांचा चहा कार्यशाळेला आलेल्यांनी फस्त केल्याने जेवणापूर्वी त्या परिवाराला उघडलेले गेट लावावे लागल्याची नामुष्की ओढवली.शेतकरी कार्यशाळेला मान्यवरांची दांडीतालुकास्तरीय कार्यशाळेचे अध्यक्ष जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ, मेळघाटच्या आमदार प्रभुदास भिलावेकर, दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले, जि.प. अध्यक्ष नितीन गुंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, विभागीय कृषी संचालक सुभाष नागरेसह मोठ्या प्रमाणात नेते अधिकाºयांनी दांडी मारल्याने नाराजी व्यक्त होत होती.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू