शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Maharashtra Election 2019 : आघाडीच्या जाहीरनाम्यात चंद्रावर प्लॉट देणेच बाकी- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 7:22 PM

आघाडीने जाहीरनाम्यात जगातील सर्वच आश्वासने देऊन टाकली. फक्त ताजमहाल बांधून देऊ किंवा चंद्रावर प्लॉट देऊ, एवढेच काय ते राहून गेले आहे.

दर्यापूर : आघाडीने जाहीरनाम्यात जगातील सर्वच आश्वासने देऊन टाकली. फक्त ताजमहाल बांधून देऊ किंवा चंद्रावर प्लॉट देऊ, एवढेच काय ते राहून गेले आहे. पाच वर्षांत सर्वच प्रश्न सुटले किंवा शिल्लकच नाहीत, असा दावा आपण करणार नाही; मात्र आघाडी सरकारने १५ वर्षांत काय कामे केलीत, याचा हिशेब द्यावा, आम्ही पाच वर्षांचा हिशेब देतो, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते शनिवारी स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली. या निवडणुकीत कुठेही चुरस राहिलेली नाही. लहान मुलांना जरी विचारले तरी ते सांगतील की, महाराष्ट्रात भाजप-सेना महायुतीचेच सरकार येणार आहे. जागा २२० की २४० हाच प्रश्न आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसची अवस्था राहुल गांधींना ज्ञात आहे. कितीही डोके आदळले तरी आपल्याला महाराष्ट्रात जागा मिळत नाहीत. म्हणून ते बँकॉकला निघून गेले आहेत. त्यांना राज्यात तोंड दाखवायलाही जागी उरली नसल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष खाली होण्याच्या मार्गावर आहे. मैदानात आता कोणी राहिले नाही. आमचे पैलवान तेल लावून आहेत. आता भारतीय जनता पक्षाला स्पर्धकच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.५० लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. पात्र शेतक-यांना जोपर्यंत लाभ मिळणार नाही, तोपर्यंत योजना सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडीने शेतक-यांना १५ वर्षांमध्ये २०  हजार कोटींचे अनुदान दिले. आम्ही पाच वर्षांत ५० हजार कोटींचे अनुदान शेतक-यांना दिले आहे. राज्यातील १४० प्रकल्पांचे कामे पाच वर्षांत पूर्णत्वास गेल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे व उमेदवार उपस्थित होते. ------------------तापी रिचार्जमुळे सिंचनाची सुविधाजिल्ह्यातील तापी मेघा रिचार्ज प्रकल्पासाठी सहा हजार कोटींच्या आराखड्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प समोर जाईल. यामुळे शेतक-यांना सिंचनाची मोठी सोय होणार आहे. खारपाणपट्ट्यालाही सिंचनाचा लाभ होणार असल्याचा उल्लेख करीत, दर्यापूर तालुक्यातील तब्बल 1700 शेततळी पूर्ण झाली आहेत; राज्यात दर्यापूर तालुक्याने रेकॉर्ड केला असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019