शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर

By admin | Published: August 21, 2016 11:57 PM

महापालिकेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपत असून तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या ....

प्रारुप प्रभागरचना ७ सप्टेंबरला : अंतिम अधिसूचना २१ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणारअमरावती : महापालिकेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपत असून तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचे वेळापत्रक जारी केले आहे. ७ सप्टेंबर ते २१ नोव्हेंबर २०१६ दरम्यान निवडणूक कार्यक्रम राबविला जाणार आहे.शासनाने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रारूप प्रभागरचना पद्धत लागू करण्याबाबत १९ मे २०१६ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश काढून अधिनियमात दुरूस्ती केली आहे. त्यानुसार महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेऊन जास्तीत जास्त चार सदस्यांचे प्रभाग करावयाचे आहेत. सर्व प्रभागात चार सदस्य होत नसल्यास एक प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा होईल. अथवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे होतील, अशी रचना करण्याचा सूचना आहेत. आरक्षण निश्चितीकरिता १३ जून २०१६ रोजी नियम- २०१६ पारित केले आहे. त्यानुसार आरक्षित प्रभाग निश्चित करण्याची कार्यवाही महापालिका आयुक्तस्तरावर करावयाची आहे. प्रारूप प्रभागरचना करणे, सोडत काढणे, प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागविणे, अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे आदी कार्यवाही महापालिका प्रशासनाला करावी लागेल, असे राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि.ज.वागळे यांनी कळविले आहे. बृहन्मुंबई वगळता ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या महापालिकांसाठी हा कार्यक्रम लागू करण्यात आला आहे.अमरावती मनपात ८७ सदस्य संख्या असून ४३ प्रभाग आहेत. त्यानुसार प्रभागरचना करण्याची तयारी करावी लागणार आहे. यावेळी प्रभागाचे सीमांकन राज्य निवडणूक आयोग ‘गुगल मॅपिंग’ने करणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा वेळ वाचणार आहे. सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)निवडणूक कार्यक्रमअनुसूचित जाती व अनुसूचित जमातींकरिता आरक्षित प्रभाग निश्चिती-७ सप्टेंबर २०१६प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव आरक्षण तपासणी करुन निवडणूक आयोगाला पाठविणे- १२ सप्टेंबर २०१६प्रारुप प्रभागरचनेच्या आरक्षण प्रस्तावास मान्यता देणे- २३ सप्टेंबर २०१६ओबीसी महिला, पुरुष प्रवर्ग सोडत काढण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे- ४ आॅक्टोबर २०१६ओबीसी महिला, पुरुष प्रवर्ग सोडत काढणे- ७ आॅक्टोबर २०१६प्रारुप प्रभागरचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे- १० आॅक्टोबर २०१६प्रारुप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविणे १० ते २५ आॅक्टोबर २०१६प्रारुप प्रभागरचनेबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी- ४ नोव्हेंबर २०१६प्रारुप प्रभागरचनेबाबत प्राप्त हरकती व सूचना निवडणूक आयोगाकडे सादर करणे- १० नोव्हेंबर २०१६प्रारुप प्रभागरचनेबाबत प्राप्त हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करुन निर्णय देणे- २२ नोव्हेंबर २०१६प्रभागरचनेच्या अधिसूचना व नकाशामध्ये योग्य ते बदल करुन प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे- २५ नोव्हेंबर २०१६