शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

एसबीआयमधून आणखी एकाचे दीड लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 11:32 PM

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यांमधून परस्पर पैसे काढण्यात येत असल्याच्या प्रकाराने खातेदार धास्तावले आहेत.

ठळक मुद्देचोरीचे सत्र थांबेना : सायबर सेलपुढील आव्हान कायम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यांमधून परस्पर पैसे काढण्यात येत असल्याच्या प्रकाराने खातेदार धास्तावले आहेत. दुसरीकडे दररोज खात्यातून पैसे लंपास होण्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी आणखी एका खातेदाराच्या खात्यातून १ लाख ४० हजारांची रोख काढून घेतल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सायबर सेलसमोर चौकशीचे आव्हान कायम आहे.रेल्वे खात्यातून सेवानिवृत्त केशव पाडुरंग गुल्हाने (६२, रा. पवननगर, बडनेरा) यांचे बडनेरातील एसबीआय शाखेत खाते आहे. शुक्रवारी त्यांच्या मोबाइलवर संदेश प्राप्त झाला. त्यानुसार अज्ञात इसमाने खात्यातील १ लाख ४० हजारांची रोख विड्राल केल्याचे समजले. एसबीआय शाखेतून खात्री केल्यानंतर त्यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.पंधरावी घटनाएसबीआयच्या खातेदारांच्या खात्यातून पैसे चोरीही ही पंधरावी घटना समोर आली असून आता नागरिकांची एसबीआय बॅकेविषयी विश्वासर्हा राहीली नाही. याविषयी सायबर सेल कसून चौकशी करीत आहे. आतापर्यंत पोलिसांनी शहरातील दहा ते पंधरा एटीएमचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. मात्र, पैसे चोरणाºया टोळीविषयी काही आढळून आले नाही. त्यामुळे अशाप्रकारचे गुन्हे करणाºया सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम पोलीस करीत असून त्यांच्या तपासाची दिशा बदलण्याचे संकेत आहे.जिल्हाधिकाºयांनी एसबीआयला मागितला अहवालखात्यातूनच परस्पर पैसे काढण्याचे प्रकार एसबीआयबाबत अधिक प्रमाणात घडले आहेत. ही बाब जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी गंभीरतेने दखल घेतली असून, त्यांनी एसबीआयला पत्र दिले आहे. पैसे परस्पर काढले जाण्यासंदर्भात इत्थंभूत माहिती त्यांनी मागविली असून, बँकेने केलेल्या चौकशीचा अहवालही जिल्हाधिकाºयांनी मागविला आहे. या गंभीर प्रकारावर लवकरात लवकर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी पावले उचलली आहेत. ही बाब शासनास्तरापर्यंत जाण्याचे संकेत वर्तविले जात आहे.धारणीच्या शिक्षकाचे पैसे गुडगावमधून केले ‘कॅश’लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : एटीएममधून परस्पर रक्कम काढण्याचा फटका धारणीतील शिक्षकाला बसला. त्यांच्या स्टेट बँक खात्यातून गुडगाव येथून २५ हजार रुपये काढल्याची तक्रार बँक व्यवस्थापकासह पोलिसांत करण्यात आली आहे.निर्वाण पुरुषोत्तमराव दिघाडे (३६) असे फसगत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. २७ आॅक्टोबर रोजी त्यांच्या खात्यातील २५ ९३० रुपयांपैकी २५ हजार रुपये गुडगाव येथील एटीएममधून काढण्यात आल्याचा मॅसेज त्यांना मोबाइलवर आला आहे.सदर बँकेने दिलेले पासबूक, एटीएम शिक्षक निर्वाण दिघडे यांच्याकडे आहे. २६ आणि २७ आॅक्टोबर रोजी त्यांची ड्युटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बैरागड परिसरात लागली होती. तेथे रेंज नसल्याने त्यांनी मोबाइल धारणी येथे घरी ठेवला होता. कर्तव्यावरून परत आल्यानंतर मोबाइलवर सदर मॅसेज दिसताच त्यांना धक्का बसला. यासंदर्भात त्यांनी परतवाडा येथील शाखेच्या टोल फ्रीवर चौकशी केली. रक्कम अज्ञात व्यक्तीने गुडगाव येथील एटीएममधून काढल्याचे सांगण्यात आले. दिघाडे यांनी परतवाडा पोलीस व बँकेकडे ३० आॅक्टोबर रोजी तक्रार केली.