शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मेळघाटातील दुसराही मृत लांडगा रेबीज पॉझिटिव्ह, अहवालातून स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 4:30 PM

मेळघाटातील मत दुसऱ्या लांडग्याचा प्रयोगशाळेतील अहवालही रेबीज पॉझिटिव्ह आला आहे. या अहवालानंतर वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देबंगळूरू प्रयोगशाळेचा अहवालजंगलात १४ ट्रॅप कॅमेरे

नरेंद्र जावरे-

अमरावती : धारणी तालुक्यात आठ जणांना चावा घेणाऱ्या दुसऱ्या मृत लांडग्याचा प्रयोगशाळेचा अहवालसुद्धा रेबीज झाल्याचा आला आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वन विभागाने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात लोकमतने पूर्वीच शक्यता वर्तविली होती. ती तंतोतंत खरी ठरली. चवताळलेला लांडगा वजा इतर प्राणी शोधण्याची युद्धस्तरावर मोहीम राबविली जात आहे. जंगलात १४ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे.

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील चिपोली येथे २७ आदिवासी नागरिकांना चावा घेणाऱ्या लांडग्याला संतप्त नागरिकांच्या जमावाने ठार मारले होते. त्याला रेबीज झाल्याचा अहवाल बंगळुरु येथील प्रयोगशाळेतून आला होता. त्यानंतर पुन्हा शनिवारी धारणी व परिसरात चवताळलेल्या लांडग्याने आठ नागरिकांना चावा घेतला. वन विभागाने शोधमोहीम राबविली. दुसऱ्या दिवशी तो लांडगा जुटपाणी गावानजीक मृतावस्थेत आढळला. त्याचा शवविच्छेदन अहवाल बंगळूरु येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झाला असून, त्याला रेबीज झाल्याचे धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या अहवालानंतर वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली आहे.

गावातील कुत्री, पाणवठे तपासणी

लांडग्यांना रेबीज झाल्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील वाघ व बिबट इतर वन्य प्राण्यांना चवताळलेल्या प्राण्यांचा कुठलीही इजा होऊ नये. रेबीज त्यांच्यापर्यंत जाऊ नये. यासाठी सिपना व गुगामल वन्यजीव विभागात अतिदक्षतेचा आदेश देण्यात आले आहे. गावातील चवताळलेली कुत्री जनजागृती यावर सर्वत्र आदेश दिल्याचे सिपना वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांनी सांगितले. सर्व उपाययोजना व पाणवठेसुद्धा लिटमस पेपरने तपासले जात असल्याचे गुगामलचे सहायक वनसंरक्षक मच्छिंद्र ठिगळे यांनी सांगितले.

आठ टीम, २४ तास गस्त

धारणी व परिसरातील वन विभागाच्या जंगलात आठ चमूकडून सहा तासाच्या गस्ती घातल्या जात आहेत. आदिवासी गावकऱ्यांमध्ये, कॅम्पेनिंग, कॉल आल्यावर त्वरित कारवाई करून शोधमोहीम सुरू आहे.

दुसऱ्या लांडग्याचा प्रयोगशाळेतील अहवाल रेबीज पॉझिटिव्ह आला आहे. आठ चमूकडून प्रत्येकी सहा तास रात्रंदिवस गस्त सुरू आहे. १४ ट्रॅप कॅमेरे जंगलात लावलेले आहेत.

- शुभांगी डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुसर्दा/ धूळघात रेल्वे, ता. धारणी.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरणMelghatमेळघाटMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प