लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सायबर गुन्हेगारांनी आणखी एका एसबीआय खात्यातून १ लाख ६० हजारांची रोकड काढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील राजू बनारसे या खातेदाराने कोतवाली पोलिसांत मंगळवारी तक्रार नोंदविली. शहरात आतापर्यंत नऊ घटनांमध्ये तब्बल दहा लाख रुपये परस्पर काढण्यात आल्याचे उघड झाले आहेत.राजू बनारसे यांच्या मोबाइलवर मंगळवारी सकाळी चार संदेश प्राप्त झाले. एसबीआयच्या खात्यातून १ लाख ६० हजार काढण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ कॅम्प स्थित एसबीआय शाखेत चौकशी केली असता, त्यांच्या खात्यातील ४० हजारांची रक्कम चारवेळा हरियाणाच्या गुडगाव येथून काढण्यात आल्याचे समजले. याबाबत बॅक मॅनेजरने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी सांगितले. त्यानुसार त्यांनी कोतवालीत तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरुध्द भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदविला. बनारसे यांच्यासोबत घडलेला प्रकार आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ जणांसोबत घडला आहे. याविषयी सायबर सेलकडून कसून चौकशी केली जात आहे.सायबर सेलकडून जिल्ह्यातील ६ एटीएमचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु असून अद्यापपर्यंत पोलीस यंत्रणा निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही.यासंबधाने सायबर सेलचे पथक हरियाणा जाणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.बनावट खात्यांचा वापरबँक खातेदारांच्या खात्यातून विड्रॉल झालेली रक्कम ही महाराष्ट्राबाहेर हरियाणातील गुडगाव या शहरातून काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने सायबर सेलने माहिती काढली असता, रक्कम विड्रॉल करणाºया इसमाचे बँक खाते फेक (बनावट) असल्याचे निष्पन्न झाले.एटीएम क्लोनचाच प्रकारसायबर गुन्हेगारांनी जिल्ह्यातील एसबीआयच्या खातेदारांना टार्गेट केल्याचे निदर्शनास येत होते. मात्र, आता एक तक्रार भारतीय स्टेट बँक व बँक आॅफ महाराष्ट्रमधील खातेदारांनीही केली आहे. एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती चोरणे आणि परस्पर खात्यातून पैसे काढण्याचा हा प्रकार असल्याची सायबर सेलने पुष्टी केली आहे.सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचनाएटीएमची सुरक्षा वाºयावर असल्यामुळे सायबर गुन्हेगार खातेदारांची माहिती मिळवून पैसे काढण्यात यशस्वी झाले. यासंदर्भात पोलीस विभागाच सायबर सेलकडून संबंधित बँकांना पत्र पाठविण्यात आले असून, त्यामध्ये प्रत्येक एटीएममध्ये सुरक्षा रक्षक ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे एटीएमच्या सुरक्षेसंबंधी सर्व उपायोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.जबाबदारी बँकेचीखातेदार बँकेवर विश्वास ठेवून पैसे जमा करतात. त्यामुळे बँक खातेदारांचे जर परस्पर पैसे काढले जात असतील, तर संबंधित खातेदारांना पैसे परत करण्याची जबाबदारी बँकेची आहे.शहरातील काही एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी होत आहे. बँकांना पत्र देऊन सुरक्षेसंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत बँक खात्यातून परस्पर रोकड काढल्याच्या नऊ घटना समोर आल्या आहेत.- कान्होपात्रा बन्सा,पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल.