सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना एक महिन्याकरिता मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येणार असल्याचे ना. ठाकूर यांनी सांगितले. या निर्णयानुसार दोन रुपये प्रतिकिलो गहू व तीन रुपये प्रतिकिलो तांदूळ याप्रमाणे अन्नधान्य खरेदी करीत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थींना त्यांना देय असलेले अन्नधान्य मोफत देण्यासंदर्भात सर्व क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. माहे एप्रिल व मे या कालावधीसाठी अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींसाठी यापूर्वी नियमित मासिक नियताद्वारे निश्चित करण्यात आलेल्या परिमाणानुसार अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
ज्या लाभार्थींना एप्रिलचे देय अन्नधान्य खरेदी केले नसेल, त्यांना एप्रिलसाठी देय असलेले अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे तसेच प्रत्येक लाभार्थीस एकाच वेळी एक महिन्यासाठी मोफत अन्नधान्य य एका महिन्यासाठी खरेदी करावयाचे अन्नधान्य दोन्ही एकत्रितरीत्या मिळण्याची सुविधा पॉस मशीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.बॉक्स
अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो रेशन मोफतएप्रिल व मे महिन्यात जे लाभार्थी रास्त भाव दुकानामध्ये अन्नधान्य खरेदी करण्यास येतील, यामध्ये ज्या लाभार्थीने एप्रिलसाठी त्या लाभार्थीस देय असलेले अन्नधान्य यापूर्वीच खरेदी केले असेल, त्या लाभार्थीस मेसाठी देय असलेले अन्नधान्य (अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थीस प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थीस प्रतिमाह प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य) मोफत देण्यात येणार आहे.