लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आमदार यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, बबलू शेखावत, नीलिमा काळे, प्रशांत डवरे यांच्यासह अनेक नेत्यांना सोमवारी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (३) एस.व्ही. देशपांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीनसाठी ही मंडळी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित होती.शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतमालाला योग्य भाव, यासाठी काँग्रेसजनांनी सन २०१५ व २०१७ साली तीव्र आंदोलन छेडले होते. रहाटगाव बसस्थानकासमोर आणि नांदगाव पेठ येथे आंदोलनादरम्यान महामार्ग रोखून धरला होता. नांदगाव पेठ पोलिसांनी ११ आणि ६९ असे एकूण ८० आंदोलकांवर भादंविच्या कलम १४३, ३४१ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी विधीज्ञ पंकज ताम्हणे तसेच विधीज्ञ अमित जामठीकर यांनी काम पाहिले.
काँग्रेस नेत्यांची जामिनासाठी न्यायालयात उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:04 PM
आमदार यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, बबलू शेखावत, नीलिमा काळे, प्रशांत डवरे यांच्यासह अनेक नेत्यांना सोमवारी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (३) एस.व्ही. देशपांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीनसाठी ही मंडळी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित होती.
ठळक मुद्देशेतमालाच्या भावासाठी आंदोलन : न्यायालयाचा दिलासा