रोखपालाकडून सूचना, २० हजारांवरील रक्कम काढताना नाहक त्रास
चांदूर रेल्वे : शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून रक्कम काढताना रोखपाल २० हजारांवरील रकमेच्या विड्रॉल मान्यतेसाठी वरिष्ठांचे केबिन गाठावे लागते. रोखपालच तशा सूचना ग्राहकांना देत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
बँकेकडे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असूनही ज्येष्ठ नागरिकांसह ग्राहकांना हा नाहक हेलपाटा सहन करावा लागतो. बँकेकडून चांगली सेवा मिळावी, अशी माफक इच्छा ग्राहकांची असते. तथापि, ग्राहकच घाई करीत असल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
----------
आम्हा ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहावे लागते. प्रत्यक्ष रक्कम घेण्याची वेळी येते त्यावेळी रोखपाल स्लिपवर सही घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवितात. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याकडून हे काम केल्यास आमचा त्रास थोडा कमी होईल.
- सुनंदा मेंढे, ज्येष्ठ नागरिक
------------
२० हजारांवरील रकमेचे विड्रॉल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया आहे. त्यासाठी बँकेत चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. मात्र, ग्राहक घाई करीत स्वत: सहीसाठी येतात.
- राहुल खंडाते, व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया