लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत मृतांच्या वारसांना आणि पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळणार काय, शिवाय आई व मुलाचे संयुक्त खाते असतानाही कर्ज वेगवेगळे असेल तर कर्जमाफीचा लाभ कोणाला, यांसह अन्य शंकांचे निरसन करण्यात आले आहे. आॅनलाईन अर्जात दुरूस्ती करता येत असल्याने प्रक्रियेतील दोषनिवारण झाले आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून नियमित कर्जफेड करणाºयांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ३०० केंद्रांद्वारे मोफत अर्ज भरण्यात येत आहेत. आता सर्व्हरची गती वाढली असली तरी अनेक अडचणी आहेत. केंद्रचालक शेतकºयांचे पुरेसे समाधान करीत नसल्याने गोंधळात भर पडली आहे. परंतु शासनाने शेतकºयांसमक्ष उद्भवणाºया संभाव्य शंकांचे समाधान करणारी माहिती जाहीर केल्याने प्रक्रिया सोपी झाली आहे. मृतांच्या वारसांनी कर्जखात्यावर वारसनोंद करण्यासाठी बँकेकडे अर्ज करावा व बँकांनी नोंदी करून द्याव्यात, बँकेने मृताच्या कर्जखात्याची विभागणी करून रक्कम निश्चित करावी, वारसांनी कर्जाचा तपशील स्वत:च्या माहितीत समाविष्ट करावा. भूमी अभिलेखाच्या नोंदीला उशिर होणार असेल तर प्रत्येक वारसाला कुटूंबासाठी करावयाच्या अर्जामध्ये मृत नातेवाईकांच्या विभाजीत कर्जखात्याचा तपशील नमूद करावा लागेल.प्रत्येक कुटुंबाला दीड लाखापर्यंत मिळणार लाभआई व मुलाचे संयुक्त खाते आहे. मात्र, कर्ज स्वतंत्र असल्यास व मुलगा सज्ञान असल्यास त्याने व आईने स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. त्यांना स्वतंत्ररित्या प्रत्येक कुटुंबाला दीड लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो. मात्र, मुलगा १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्यास आईने दाखल केलेल्या अर्जातच अज्ञान मुलाच्या कर्जाचा तपशील समाविष्ट करावा लागणार आहे.वेगवेगळ्या बँकांच्या दोन कर्जांसाठी एकच अर्जएकाच व्यक्तीने दोन वेगळ्या बँकांकडून कर्ज घेतले असेल किंवा पती-पत्नीने दोन बँकांचे कर्जधारक असतील कर्ज घेतले असल्यास दोगांना कुटूंबाच्या व्याख्येनुसार एकच अर्ज भरावा लागेल. अशा प्रकरणात प्रती कुटूंब दीड लाख रूपयांचा लाभ मिळेल. मात्र, कर्ज दीड लाखांपेक्षा अधिक असल्यास त्यावरील रक्कमेचा भरणा केल्यानंतरच दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल.अल्पवयीन कर्जधारक सज्ञान झाल्यास कर्जमाफीचा लाभमुलगा अल्पवयीन असताना शेतकºयाने कर्ज घेतले होते. मात्र, आता मुलगा सज्ञान झाला असल्यास त्याला कर्जमाफीसाठी स्वतंत्र अर्ज करता येतो किंवा कुटूंबप्रमुख यानात्याने वडिलांनाी अर्ज करता येईल. पती-पत्नीचा घटस्फोट झाला नाही मात्र ते विभक्त असल्यास कर्जदार शेतकºयाने पत्नीच्या माहितीसह आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज दुरूस्तीची सुविधा मृतांच्या वारसांनाही लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 10:29 PM
कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत मृतांच्या वारसांना आणि पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळणार काय,
ठळक मुद्देकर्जमाफीचे अर्ज : पोर्टलची गतीवाढ, केंद्रचालकांना जिल्हाधिकाºयांची तंबी